शरद पवार यांच्यात लढण्याचं बळ आहे- संजय राऊत

शरद पवार यांच्यात लढण्याचं बळ आहे- संजय राऊत
Updated on

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोमवारी पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. आधी पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णलयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शरद पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. 31 मार्च रोजी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या घटनेबाबत बोलताना, शरद पवार यांच्यात लढण्याचं बळ आहे आणि ते लवकर तंदुरूस्त होतील असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

"कालपासून शरद पवार यांची तब्येत थोडी खराब होती. त्यांना पुढील आठ ते १० दिवस आरामाची गरज आहे. त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सुप्रिया ताईंनी दिली आहे. शरद पवार यांचा केरळचा कार्यक्रम रद्द झाला आहे. तसेच पश्चिम बंगालमधील कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आला आहे असं सुप्रिया ताईंकडून समजले. पवार यांची प्रकृती लवकर ठणठणीत होवो. शरद पवार यांच्यात लढण्याचं बळ आहे. त्यामुळे ते लवकर बरे होतील आणि पुन्हा एकदा आम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील", असा विश्वास राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला.

"त्या भेटीत सस्पेंस ठेवण्यासारखं काय आहे? देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांच्यात जर भेट आणि चर्चा झाली असेल तर त्यात चुकीचं काय? एखादा मोठा नेता किंवा खासदार गृहमंत्र्यांना भेटला तर त्यात काहीही वावगं नाही. अमित शाह यांना आम्हीही भेटू शकतो. कोणीही भेटू शकतं. ते देशाचे गृहमंत्री आहेत, त्यामुळे अशा भेटींमध्ये काहीही चूक नाही", असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.