Sharad Pawar: "शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारेच महाराष्ट्राच्या एकात्मतेला धोका," शरद पवारांचा हल्लाबोल

Navi Mumbai Aikya Parishad: यामध्ये पवार यांनी सध्या देशातील तसेच राज्यातील बघडलेल्या समाजिक परिस्थितीवर भाष्य केले.
Sharad Pawar Vashi Navi Mumbai
Sharad Pawar Vashi Navi MumbaiEsakal
Updated on

नुकतेच नवी मुंबई येथे एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे होते. यामध्ये पवार यांनी सध्या देशातील तसेच राज्यातील बिघडलेल्या समाजिक परिस्थितीवर भाष्य केले. याचबरोबर "शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारेच महाराष्ट्राच्या एकात्मतेला धोका," असा थेट हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

यावेळी बोलताना शरद पवारांनी शिवाजी महाराज आणि त्यांनी समाजिक एकतेसाठी केलेले काम याबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, "या देशात आजपर्यंतच्या काळात अनेक राजे होऊन गेले. पण आज 350 वर्षांनंतरही त्यांनी केलेल्या कार्याचा कुठे उल्लेख आला तर शिवाजी महाराजांचे नाव पहिल्या स्थानी असते. देशात यादव आणि मुघल राजे होऊन गेले. त्यांची राज्ये त्यांच्या नावाने ओळखली जायची. पण शिवाजी महाराजांचे राज्य भोसलेंच्या नावाने नाही तर रयतेचे राज्य आणि हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले गेले."

Sharad Pawar Vashi Navi Mumbai
Sharad Pawar: " महाराष्ट्रातही निर्माण झाली असती मणिपूरसारखी परिस्थिती पण.. ", शरद पवारांनी सांगितलं कारण

पुढे बोलताना पवार म्हणाले, "महाराष्ट्र हे रयतेचे राज्य असल्याचे शिवाजी महाराजांनी त्यांच्या कृतीतून दाखवले. जेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका संदर्भातील प्रश्न आता तेव्हा स्थानिक समाजातील काही लोकांनी हा अभिषेक करण्यासाठीही नकार दिला. शेवटी उत्तरेकडून कोणालातरी आणावे लागले आणि अभिषेक करावा लागला. याचा अर्थ असा की, त्या कालखंडातही ऐक्याला धक्का देणारा एक वर्ग समाजामध्ये होता. आणि दुर्दैवाने तो आजही कुठे ना कुठे पाहायला मिळतोय."

Sharad Pawar Vashi Navi Mumbai
Anil Deshmukh:'समित कदम फडणवीसांचा जवळचा माणूस, त्याला Y दर्जाची सुरक्षा'; फोटो दाखवत अनिल देशमुखांचे गंभीर आरोप

दि.मंगेश आमले इनिशेटिव्ह यांच्या वतीने नवी मुंबई येथे देशातील पहिल्या सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे अध्यक्षपद शरद पवार यांनी भूषविले. यावेळी त्यांनी समाजातील वेगवेगळ्या घटकांना समानता व ऐक्य याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या कार्याचाही उल्लेख केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.