Latest Navi Mumbai News: नवी मुंबईतील राजकारणात लवकरच मोठी उलथापालट होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा हे लवकरच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
पवार गटानेही नाहटा यांना हिरवा कंदील दिल्याचे समजते आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या हंगामात नाहटा यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यास महायुतीच्या उमेदवाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
विजय नाहटा हे यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत. नाहटा यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. रोज विविध कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रमांमुळे नाहटा यांचा मोठा चाहतावर्ग बेलापूर पट्ट्यात तयार झाला आहे, मात्र सोमवारी (ता. ७) दिल्लीत पार पडलेल्या वरिष्ठांच्या बैठकीत नवी मुंबईतील दोन्ही जागा भाजपला सुटण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
ही जागा नाहटा यांना मिळेल अशी आशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना होती; मात्र आता ही जागा भाजपच्या गोटात जाणार असल्याने नवी मुंबईतील शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून प्रचंड राजकीय उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत.
नाहटा यांच्या समर्थकांनी शहरात बॅनरबाजी करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईत अनेक ठिकाणी नाहटा यांच्या नाराजीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नाहटा यांच्यासोबत शिवसेनेतील शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याची तयारी केली आहे. येत्या दोन दिवसांत नाहटा पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये काम करीत असताना २०१९ मध्येही मित्र पक्षाच्या उमेदवाराला जागा दिली. तेव्हा शांत बसावे लागले होते, मात्र आता शिवसैनिकांच्या भावना आता तीव्र झाल्या आहेत. सर्वांनी कर्नाळा येथे एकत्र येऊन मला निवडून आणण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे मी लोकांच्या मनातील आमदार आहे. लोकआग्रहाचा मला मान ठेवावा लागेल.
- विजय नाहटा, उपनेते, शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.