नाथाभाऊंची ताकद महाराष्ट्राला दाखवू, शरद पवारांचं सूचक विधान

नाथाभाऊंची ताकद महाराष्ट्राला दाखवू, शरद पवारांचं सूचक विधान
Updated on

मुंबई : एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज मुंबईत पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी स्वतः शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं. 

शरद पवार म्हणालेत, जेंव्हा राष्ट्रवादी पक्ष राज्यात मोठा करायचा विचार येतो तेंव्हा कायम खान्देश डोळ्यासमोर येतो. राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी अनेकजण अनेक वर्षांपासून कष्ट करतायत. त्याला खऱ्या अर्थ्यांनी गती द्यायची असेल तर नाथाभाऊंची गरज आहे असं शरद पवार म्हणालेत. खरंतर खान्देश हा गांधी आणि नेहरूंच्या विचाराने वाढलेला आहे. हे सांगत असताना शरद पवारांनी काही उदाहरणे देखील दिलीत. गांधी आणि नेहरूंच्या नेहरूंच्या विचारांनी काम करणाऱ्या या जिल्ह्यात काँग्रेसला उतरती कळा लागली. त्या काळात तिथे नाथाभाऊंनी नवी पिठी उभी केली याचा आवर्जून शरद पवारांनी उल्लेख केला. नाथाभाऊंमुळे खांदेशातील कार्यकर्ता यशस्वी झाला हे देखील शरद पवार बोलायला विसरले नाहीत.    

नाथाभाऊ जे बोलतात ते करतात : 

पक्ष प्रवेशावेळी एकनाथ खडसे यांनी खान्देशात राष्ट्रवादी विचारांना मोठं करण्याचा विडा उचललाय. कोरोना संपल्यावर आपण मोठं शक्तिप्रदर्शन देखील करू असं उघडपणे बोलणं ही मोठी गोष्ट असते. नाथाभाऊ जेंव्हा बोलतात तेंव्हा ते करणार म्हणजे करणार असा विश्वास शरद पवारांनी आजच्या संबोधनात बोलून दाखवला.  

सरकार शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभं​ :

आज आपल्यासमोर अनेक अडचणी आहेत. या परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभं आहे. आताच मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केलेली केलेली आहे याची माहितीही शरद पवारांनी दिली 

बातम्यांना पूर्णविराम : 

गेले काही दिवस टीव्हीवर एकच बातमी पाहायला मिळतेय ती म्हणजे नाथाभाऊंची. सोबतच अनेक चर्चा सुरु आहेत अजित पवार नाराज आहेत का? मात्र तसं काहीही नाही. गेल्या काही काळात अनेकांना कोरोना होऊन गेलाय. अशात आपल्याला अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. अशा संकटाना तोंड देताना खबरदारी घेणं गरजेचं आहे, असं पवार म्हणाले.

सोबतच शरद पवार यांनी नाथाभाऊंना कोणतं पद किंवा खातं दिलं जाणार याबाबत देखील गोष्टी स्पष्ट केल्यात. येत्या काळात पक्षात कोणतीही मोठी घटना घडणार नाही, सगळे आहे तिथेच राहणार आहेत. एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशामुळे कोणताही बदल होणार नाही, काही नेत्यांचं मंत्रिपद काढून खडसेंना ते दिलं जाईल या बातम्यांना आधार नसल्याचं पवार म्हणालेत . 

कोरोना संपल्यावर शक्तीप्रदर्शन 

कोरोनाचा काळ लोटल्यावर आपण जळगावात जाऊ आणि नाथाभाऊंची ताकद काय आहे हे महाराष्ट्राला दाखवू असं देखील शरद पवार आपल्या भाषणाअंती म्हणालेत.

sharad pawars speech during eknath khadses NCP party joining ceremony 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.