ज्येष्ठांना मिळणार ‘शरद शतम आरोग्य कवच’; सव्वा कोटी नागरिकांना लाभ

२७ प्रकारच्या मोफत चाचण्या
senior citizen
senior citizen sakal media
Updated on

मुंबई : ‘शरद शतम आरोग्य कवच’ योजनेच्या (Sharad shatam arogya yojana) माध्यमातून राज्यभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या (senior citizens health care) आरोग्याची काळजी घेण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले (Mahatma jyotirao phule janarogya yojana) जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ही आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये २७ प्रकारच्या मोफत चाचण्या (Free tests) केल्या जाणार असून त्याचा राज्यातील सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

‘शरद शतम आरोग्य कवच’ योजनेंतर्गत राज्यातील ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाईल. त्यामध्ये नागरिकांची नाडी, रक्तदाब, श्वसनाची गती, ऑक्सिजनची पातळी, वजन आदींची तपासणी करून त्याबाबतच्या नोंदी घेतल्या जातील. तसेच एका प्रश्नावलीच्या आधारे त्यांच्या आजारांबाबतची माहिती जाणून घेतली जाईल. प्रत्येक जेष्ठ नागरिकाच्या २७ प्रकारच्या चाचण्या केल्या जातील आणि त्याचा अहवाल मोबाईलवर लिंक तसेच अॅपद्वारे उपलब्ध केला जाईल. एखादा आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना संदर्भित केलेल्या रुग्णालयामध्ये उपचार घेता येईल. त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल.

ज्येष्ठांच्या वेळीच आरोग्य तपासणी न झाल्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांना आजार लक्षात येतो. परिणामी उपचार घेण्यास विलंब झाल्याने रुग्ण दगावण्याचा धोका असतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या वेळोवेळी तपासण्या करून समुपदेशन, आहारशैलीमध्ये बदल, उपचार, शस्त्रक्रिया, फिजियोथेरपी आदींच्या साह्याने त्यांचे शाररीक व मानसिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल.
- डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना

मोबाईल अॅपचा वापर

योजनेच्या संपूर्ण बाबी संगणक प्रणालीद्वारे व अॅपद्वारे हाताळण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र , शासकीय आरोग्य सुविधा येथील डॉक्टर संगणक प्रणालीद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य चाचण्यांचे अहवाल, प्रश्नावलीतील निवड करण्यात आलेले पर्याय याचे अवलोकन करून पुढील उपचाराची दिशा ठरवेल व त्याप्रमाणे जेष्ठ नागरिकास पुढच्या स्तरावरील शासकीय आरोग्य सुविधेमध्ये राज्याच्या आरोग्य विमा योजनेसाठी अंगीकृत खाजगी अथवा शासकीय रुग्णालयात संदर्भित करेल. यात शासकीय रुग्णालये तसेच महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेमध्ये अंगीकृत करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांचा समावेश असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.