Tungeshwar Mahadev Mandir : श्रावण महिना सुरु झाला कि, हिंदूंचे अनेक सण सुरु होतात. या महिन्यात श्रावनी सोमवार, शनिवार, मग नाग पंचमी, मंगळागौर , गणपती असे अनेक सण येत असतात. शरण हा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात भाविक महादेवाच्या मंदिरांना भेट देत असतात. पालघर जिल्ह्यातील वसई जवळील पुरातन देवस्थान म्हणून ओळख असलेल्या तुंगारेश्वर महादेव मंदिरात हि भाविकांची मोठ्या प्रमाणत गर्दी होत असते.
या बाबत आसे सांगितले जाते कि, तुंगार पर्वतावर असलेल्या या तुंगारेश्वर मंदिरात विमलासूर राक्षसाने शिवलिंग स्थापन केले.तर भगवान परशुरामांनी तुंग राक्षसाचा याठिकाणी वध केल्याची आख्यायिका हि प्रसिद्ध आहे.
हा परिसर अतिशय निसर्गरम्य असा आहे. .वसई पूर्वेला असलेले तुंगारेश्वर शिवमंदिर जमिनीपासून 2177 फूट उंचीवर आहे. पाच पर्वतांचा समूह असलेल्या तुंगारेश्वरमध्ये शिव, काल भैरव (शिवाचा अवतार), जगमाता मंदिर (भगवान शिवाची पत्नी पार्वतीचा अवतार), बालयोगी सदानंद महाराज मठ आणि इतरांसह अनेक अत्यंत पवित्र मंदिरे आहेत.
वसईतील तुंगारेश्वर शिव मंदिर हे या भागातील सर्वात लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.तुंगारेश्वर अभयारण्यात असलेल्या ह्या मंदिराकडे पावसाळ्यत जाताना रस्त्यात छोटी नदी आणि छोटे धबधबे भाविका बरोबरच पर्यटकांनाही आकर्षित करत असतात. त्यामुळे पावसाळ्यात तरुणाईची पावलेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वळत असलेली दिसत आहेत.
. हे 100 वर्षांहून अधिक जुने आणि परिसरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असल्याचे मानले जाते. मंदिरात अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले वास्तुकला, बारीक नक्षीकाम केलेले दगडी खांब, भिंती आणि शिल्पे आहेत.मंदिर परिसरात आजही कोकमाची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत.
तुंगारेश्वर शिव मंदिरापर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाने या ठिकाणी जात येते. तर रेल्वेने पश्चिम रेल्वे मार्गावर विरारकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांमधून वसईला उतरून रिक्षा किंवा एसटी,नाहीतर महानगरपालिकेच्या परिवहन बस मधून याठिकाणी जात येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.