Share Market: निर्देशांक विक्रमी उंचीवर; अदानी शेअर्स नरम गरम

इतिहासात पहिल्यांदाच निफ्टीची 15,850 पार मजल
stock market
stock market
Updated on

इतिहासात पहिल्यांदाच निफ्टीची 15,850 पार मजल

मुंबई: भारतीय निर्देशांक आज नव्या सर्वकालिक उच्चांकांवर पोहोचले तर दुसरीकडे अदानी समूहातील समभाग आजही नरम गरमच राहिले. सेन्सेक्स 52,773 अंशांवर तर निफ्टी 15,869 अंशांवर बंद झाला. आज सेन्सेक्स 221 अंश तर निफ्टी 57 अंश वाढला. या दोनही निर्देशांकांनी आज नवा सर्वकालिक उच्चांक नोंदविला. (Share Market Update on 15th June Sensex Nifty closes all time high)

stock market
"काँग्रेसमुक्त भारत सोडा; आम्ही भाजपमुक्त महाराष्ट्र केला"

आज एशियन पेंट्स, अ‍ॅक्सिस बँक, ICICI बँक, हिंदुस्थान युनिलीव्हर, इंडसइंड बँक व इन्फोसिस या समभागांचे दर वाढले. तर डॉ. रेड्डी, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, टीसीएस, लार्सन टुब्रो या समभागांचे दर घटले. काल सपाटून आपटलेल्या अदाणी समूहाच्या सहा समभागांपैकी अदाणी पोर्ट्स, अदाणी पॉवर, अदाणी ट्रान्समिशन व अदाणी टोटल गॅस हे चार समभाग आजही दिवसअखेर घट दाखवीत स्थिरावले. तर फक्त अदाणी एंटरप्रायझेस व अदाणी ग्रीन हे समभाग वाढ दाखवीत बंद झाले.

आजचे सोन्या-चांदीचे दर

24 कॅरेट सोने (10 ग्रॅम)- 48 हजार 600 रुपये

चांदी (1 किलो)- 71 हजार 500 रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.