मुंबई: शीना बोरा हत्याकांड प्रकरणात तपासादरम्यान १२ वर्षांपूर्वी पेण पोलिसांना सापडलेले हाडांचे अवशेष गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे अवशेष शीनाच्या हत्याकांडाच्या खटल्यात महत्त्वाचा पुरावा होते. शोध घेऊनही हे अवशेष सापडले नाहीत, अशी माहिती ‘सीबीआय’ने सत्र न्यायालयात दिली आहे.
वांद्रे येथे २४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली. शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिचा चालक श्यामवर राय याला अटक करण्यात आल्यानंतर इंद्राणीला २०१५ मध्ये पोलिसांनी अटक केली. तिच्याबरोबरच तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना याला तर सीबीआयने कटात सहभागी झाल्याबद्दल इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी याला अटक केली.
विशेष सीबीआय न्यायालयात सध्या या हत्याकांडप्रकरणी खटला सुरू आहे. २०१२ मध्ये शीनाचा मृतदेह जाळलेल्या ठिकाणी पेण पोलिसांना काही अवशेष सापडले होते. त्या अवशेषांची पहिली चाचणी जे. जे. रुग्णालयातील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. झेबा खान यांनी केली होती. ते अवशेष मानवी हाडांचे असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला होता.
खटल्यात ९१ वे साक्षीदार म्हणून सीबीआय त्यांची साक्ष तपासत आहे. १२ वर्षांपूर्वी सापडलेल्या अवशेषांची ओळख पटवण्याच्या हेतूने ते अवशेष खान यांना दाखवण्याची इच्छा सीबीआय वकील सी. जे. नांदोडे यांनी मागील सुनावणीवेळी व्यक्त केली होती.
मात्र, ते अवशेष न्यायालयापुढे सीबीआयला सादर करताच आले नाहीत. खूप शोध घेऊनही ते अवशेष सापडले नाहीत, अशी माहिती ॲड. नांदोडे यांनी न्यायालयात दिली. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी तहकूब केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.