Sheena Bora Murder Case : हाडे सापडलीच नव्हती... इंद्राणीचा सांगाडा अन् राहुल मुखर्जीबाबत मोठा दावा, जाणून घ्या काय म्हणाली?

Sheena Bora Murder Case Update: सीबीआयने जी हाडे शीना बोराचे अवशेष असल्याचे घोषित केले होते ते गायब आहेत. रायगडच्या जंगलातून हाडे जप्त केल्यानंतर सीबीआयने त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते.
Sheena Bora Murder Case update
Sheena Bora Murder Case updateesakal
Updated on

मुंबईतील हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात नवा खुलासा झाला आहे. रायगडच्या जंगलातून 2012 मध्ये जप्त केलेली हाडे बेपत्ता झाली आहेत. याबाबत, आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी 7 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या इंद्राणी मुखर्जीने सीबीआय तपास, शीनाचा सांगाडा जंगलात सापडल्याचा कथित अवशेष आणि शीनाचा लिव्ह-इन पार्टनर राहुल मुखर्जी याबाबत मोठे दावे केले आहेत. मे 2022 मध्ये जामीन मिळाल्यानंतर इंद्राणी मुखर्जी तुरुंगाबाहेर आहे. पीटर मुखर्जी यालाही खून प्रकरणात जामीन मिळाला आहे.

सीबीआयने जी हाडे शीना बोराचे अवशेष असल्याचे घोषित केले होते ते गायब आहेत. रायगडच्या जंगलातून हाडे जप्त केल्यानंतर सीबीआयने त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते.

सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयात सांगितले की, बरीच शोधाशोध करूनही हाडे सापडली नाहीत. रायगडजवळील पेण गावच्या जंगलात २०१२ मध्ये ही हाडे सापडली होती. प्राथमिक तपासात ते मानव असल्याची पुष्टी झाली. गुरुवारी जेजे रुग्णालयातील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. झेबा खान यांच्या साक्षीदरम्यान हाडे गायब झाल्याचे उघडकीस आले.

इंद्राणी मुखर्जी यांनी सांगितले - "मला वाटते की मे 2012 मध्ये कोठेही सांगाड्याचे अवशेष सापडले नाहीत. ही एक बनावट कथा होती. खटल्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे गहाळ होऊ शकतात, त्यामुळेच मला वाटते की पुरावे कधी अस्तित्वातच नव्हते. अनेक एजन्सींनी केलेल्या हेराफेरीमुळे तपास अपूर्ण राहिला आहे.

“एजन्सींनी माझ्यावर आरोप लावण्याची गडबड केली. कारण त्यांची वेळ संपली होती. या प्रकरणाशी संबंधित लोकांची पुन्हा चौकशी झाली पाहिजे. डीएनए रिपोर्ट तयार करण्यासाठी केलेल्या अफरातफरीमुळे डीएनए तज्ञाला अटक व्हायला हवी. राहुल मुखर्जी हा माझ्या मुलीचा होणारा नवरा असल्याचा दावा करत होता आणि  त्याने शीनाला शेवटचे पाहिल्या सांगिचले होते, मला वाटते राहुलला ताब्यात घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे.

काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण?

  • 12 एप्रिल 2012 रोजी मुंबईजवळील रायगडमध्ये शीना बोराची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्यात आला व त्याचे अवशेष पेण गावच्या जंगलात फेकून दिले.

  • यानंतर 26 ऑगस्ट 2015 रोजी पोलिसांनी इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला अवैध शस्त्र बाळगल्यामुळे अटक केली आणि शीना बोराच्या हत्येचे रहस्य उघड होऊ लागले.

  • ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मुंबई पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीचा माजी पती संजीव खन्ना याला पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक केली. सीबीआयने तपास सुरू केला आणि इंद्राणी, संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांच्यावर गुन्हा दाखल केला.

  • 19 नोव्हेंबर 2015 रोजी इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी याला अटक करण्यात आली होती. शीना तिची बहीण असल्याचे इंद्राणीने पीटरला सांगितले होते. पीटरचा मुलगा राहुल आणि शीना यांचे जवळचे नाते होते.

  • 4 ऑक्टोबर 2019 रोजी इंद्राणी आणि पीटर 17 वर्षांनंतर घटस्फोटाद्वारे वेगळे झाले. 2002 मध्ये त्यांचे लग्न झाले होते.

  • यानंतर पीटर मुखर्जीला फेब्रुवारी 2020 मध्ये आणि इंद्राणी मुखर्जीला मे 2022 मध्ये जामीन मिळाला. या खटल्याला बराच वेळ लागेल, असे न्यायालयाने सांगितले.

  • 13 जून 2024 रोजी सीबीआयने न्यायालयात सांगितले की, पेण गावातील जंगलातून 2012 मध्ये सापडलेली हाडे बेपत्ता झाली होती. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या साक्षीदरम्यान ही माहिती समोर आली आहे.

Sheena Bora Murder Case update
Sheena Bora Murder: शीना बोरा हत्याकांड प्रकरणात CBI ची धक्कादायक माहिती, महत्त्वाचा पुरावा गायब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()