आरोग्य खात्यापेक्षा यमराज परवडले; भाजप महिला आघाडीचा सरकारला टोला

sheetal gambhir desai
sheetal gambhir desaisakal media
Updated on

मुंबई : राज्याच्या तसेच मुंबई महापालिकेच्या (bmc) आरोग्य खात्यापेक्षा (health authorities) यमराज परवडले. कारण यमराज व आरोग्य खाते हे दोघेही रुग्णांचा जीव तर घेतातच. पण यमराजांच्या कारभाराला निदान भ्रष्टाचाराची (corruption) आणि वसुलीची कीड तरी नाही, असा टोला मुंबई भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई (sheetal Gambhir desai) यांनी लगावला आहे.

sheetal gambhir desai
BMC : तरुणांचा लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्यावर टीका करताना देसाई यांनी वरीलप्रमाणे मतप्रदर्शन केले आहे. मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग हा एकंदर गैरकारभाराबाबत राज्याच्या आरोग्य खात्याचा जुळा भाऊच म्हणायला हरकत नाही. किंबहुना मुंबई महापालिकेचे सर्वच प्रशासन म्हणजे कारभार कसा नसावा, याचा उत्कृष्ट नमुना आहे, असे वाभाडेही त्यांनी काढले आहेत.

यापूर्वीही राज्यात भंडारा, वसई, नाशिक तसेच मुंबई महापालिकेच्या हद्दीत मुलुंड येथे रुग्णालयांमध्ये अग्नितांडव झाले होते. यात अनेक निष्पाप रुग्णांचा बळी गेला होता. रुग्णालयात गेल्यावर तब्येत सुधारली तरी अग्नीकांडामुळे मृत्यू येण्याची भीती आहे. त्यामुळे आता रुग्णालयात जावे किंवा नाही असा संभ्रम अनेक रुग्णांच्या मनात निर्माण झाला आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असून ही अवस्था सुधारण्यासाठी सरकारने तातडीने प्रयत्न केले पाहिजेत, असेही श्रीमती देसाई यांनी सुनावले आहे.

sheetal gambhir desai
सीबीएसईने केले प्रथम सत्राच्या परीक्षेत बदल; वाचा सविस्तर

सरकारला रुग्णालये चालविणे जमत नसेल तर त्यांनी ती चांगल्या स्वयंसेवी संस्थांकडे सोपवावीत. किंबहुना रुग्णालयांचे खासगीकरण सुलभ व्हावे म्हणूनच आरोग्य विभागात असा गैरप्रकार चालला आहे का, अशी शंका येत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. खरेतर आरोग्य खात्याच्या कारभारापेक्षा यमराज परवडले अशी सध्याची अवस्था आहे. यमराज आणि राज्याचे किंवा मुंबई महापालिकेचे आरोग्य प्रशासन हे दोघेही नागरिकांचे प्राण घेतातच. पण आरोग्य प्रशासन मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करते, सरकारचे अधिकारी 100 कोटींची वसुली करतात, रस्तेबांधणीत महापालिका खराब काम करते, इतर अनेक बाबतीत महापालिका प्रशासन भ्रष्टाचार करते.

महापालिका व राज्य सरकार यांच्या मनमानी कारभारामुळे कित्येक लोकांचे प्राण जातात. पण फरक असा आहे की लोकांचे प्राण घेणारे यमराज त्यात भ्रष्टाचार किंवा मनमानी करीत नाहीत, ते आपले काम तरी प्रामाणिकपणे करतात. प्रशासनाला ते देखील जमत नाही, आपले काम प्रामाणिकपणे करण्याच्याबाबतीत प्रशासनाने आपला भाऊ असलेल्या यमराजांचा आदर्श ठेवावा, असा टोलाही देसाई यांनी लगावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()