'उंदरांचा बंदोबस्त करणं शिवसेनेच्या वाघाला आता जमत नाही'

'शिवसेनेचा वाघ आता वृद्ध झाल्याची ही लक्षणे असून त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारावा हे उत्तम'
शीतल गंभीर देसाई
शीतल गंभीर देसाई
Updated on

मुंबई: "महापालिका रुग्णालयात (Bmc Hospital) उंदराने डोळा कुरतडलेल्या रुग्णाचा मृत्यू होणे ही लाजिरवाणी घटना असून उंदरांचा बंदोबस्त करणेही शिवसेनेच्या वाघाला आता जमत नाही. शिवसेनेचा (shivsena) वाघ आता वृद्ध झाल्याचीच ही लक्षणे असून त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारावा हे उत्तम" अशी बोचरी टीका भाजप महिला मोर्चाच्या मुंबई प्रमुख शीतल गंभीर देसाई (Sheetal Gambhir Desai) यांनी केली आहे. (Sheetal Gambhir Desai slam shivsena over death of rajawadi hospital patient whose eye damage by rat)

"तेलाच्या आशेने उंदराने पणतीतील जळती वात नेली तर आगी लागू शकतील असे शिवरायांचे आज्ञापत्र होते. पण निवडणुकीपुरते शिवरायांचे नाव घेणाऱ्या शिवसेनेला एवढी दूरदृष्टी नाही, हेच वारंवार दिसून येते आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शहर असलेल्या मुंबईचा कारभार असा चालत असेल तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईची मान खाली घालायला लावणारेच आहे" असे देसाई यांनी म्हटले आहे.

शीतल गंभीर देसाई
तुम्हाला AC लोकल का हवी? मध्य रेल्वेने सुरु केला सर्वे

घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात हा प्रकार झाला होता. त्यानंतर अनेक महापालिका रुग्णालयात उंदीर-घुशी, कुत्री-मांजरे यांचा मुक्त संचार असल्याचे व्हिडियोदेखील प्रसिद्ध झाले होते. त्यासंदर्भात देसाई यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शीतल गंभीर देसाई
दहावीत ९० टक्के गुण मिळवणाऱ्यांसाठी मोठी घोषणा

"एवढी वर्षे उंदीर मारण्यावर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले तरी उंदरांमुळे होणारे नुकसान थांबवणे महापालिकेला जमत नाही. दुसरीकडे भटक्या कुत्र्यांची नसबंदी करूनही त्यांची संख्या वेगाने वाढते आहे. आता भटक्या मांजरांचीही संख्या वाढत असल्याने त्यांचीही नसबंदी करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. त्याचीही अवस्था भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीप्रमाणेच होणार हे निश्चित आहे. पाळीव कुत्र्यांना फिरायला नेऊन रस्त्यावर घाण करणारे श्वानप्रेमी, वाटेल तेथे कबुतरांना खायला घालून नागरिकांना श्वसनविकार देणारे पक्षीप्रेमी यांच्यावर कायदेशीर नियंत्रण ठेवणेही पालिकेला जमत नाही. रस्त्यांवर पडणारे खड्डे, पावसात तुंबणारी मुंबई, बेबंद वाढणाऱ्या झोपड्या यापैकी कोणत्याही समस्येवर मात करणे शहराच्या कारभाऱ्यांना जमत नाही" अशी टीकाही त्यांनी केली आहे.

"शिवसेना व त्यांचे लाडके कंत्राटदार यांच्यात टॉम अँड जेरी सारखा उंदीर मांजराचा खेळ सुरु असतो. ते वरवर लटकेच भांडतात पण पुन्हा मालिदा खाण्यासाठी एकत्र येतात. कधीतरी कंत्राटदाराच्या गरीब कर्मचाऱ्याला मारहाणीचे नाटक होते, कधीतरी पालिका समितीत गुरगुर होते, पण ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी असते. याच वृत्तीमुळे नागरिकांना या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. शिवसेनेचा वाघ आता वृद्ध झाला असून तो काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताटाखालचे मांजर झाला आहे. त्यामुळे उंदरांवर देखील म्यांव करण्याची ताकद त्या वाघात राहिली नाही. या वाघाने आता वानप्रस्थाश्रम स्वीकारून नागरिकांना मोकळे करावे" असा टोलाही श्रीमती देसाई यांनी लगावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()