Dombivli News : शीळ रोडवरील कोंडीला वॉर्डन जबाबदार दक्ष नागरिकांचा आरोप; वाहतूक विभागाला दिले पत्र

कल्याण फाटा, मुंब्रा बायपास, कल्याण शीळ या रोडवर नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते
shil road traffic jam due to warden citizen allegation letter to transport department
shil road traffic jam due to warden citizen allegation letter to transport departmentSakal
Updated on

Dombivli News - कल्याण फाटा, मुंब्रा बायपास, कल्याण शीळ या रोडवर नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. विविध कामांमुळे ही कोडी होत असून ट्रॅफिक वॉर्डन या कोंडीत आणखी भर टाकत असल्याचा आरोप येथील दक्ष नागरिक करत आहेत.

वाहनांना अडवून हे वॉर्डन कारवाई करत दंड वसुली करत असून त्यांना हे अधिकार कोणी दिले ? तसेच या कारवाईमुळे देखील या भागात कोंडी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणने असून याप्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी वाहतूक नियंत्रण विभागाच्या उपायुक्तांकडे या नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शीळ, देसाई, दहिसर, कौसा विभागातील दक्ष नागरिक संघटनेने वाहतूक विभाग, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्थानिक आमदार राजू पाटील यांना पत्रव्यवहार करत ही बाब निदर्शनास आणू दिली आहे. दहिसर ते मुंब्रा बायपास तसेच देसाई ते शिळ फाटा या रस्त्यात नागरिकांना नेहमी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

shil road traffic jam due to warden citizen allegation letter to transport department
Mumbai: मुंबईत मराठी पाट्यांशिवाय पर्यायच नाही! 'मनपा'ने लावला कारवायांचा सपाटा

यामुळे नागरिक वैतागले असून वाहतूक नियंत्रण विभागाचे कोणतेही नियोजन या ठिकाणी दिसत नाही. उलट काही चुकीच्या गोष्टी आपले अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून नजरेत येत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

या मार्गात वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी नियंत्रणासाठी स्वतः न थांबता वॉर्डनवर कारभार सोपवतात. सर्वांत महत्वाचे म्हणजे आपल्या अधिकारी वर्गाकडून नेमण्यात आलेले वॉर्डन त्यांना कायद्याने कोणते ही अधिकार नसताना वाहन चालकांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडून कागदपत्रे तपासण्याचा नावावर पैसे उकळतात.

त्यामुळे या भागात इतर लोकांना वाहन कोंडीस सामोरे जावे लागते. वॉर्डनना कारवाईचे कोणतेही अधिकार नसताना ते वाहन चालकांना अडवून कारवाई कसे करतात ? असा सवाल संतप्त नागरिक व्यक्त करत आहेत.

shil road traffic jam due to warden citizen allegation letter to transport department
Mumbai: आगीसंदर्भात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; न्यायालयाची राज्य सरकारला ताकीद

मुंबा बायपास येथे सिंबोसिस शाळेसमोर, कल्याण फाटा सर्कल, शीळफाटा सर्कल येथे 10 ते १12 वार्डन रस्त्याच्या मधोमध उभे राहून कारवाईच्या नावाखाली गाड्या धांबवून मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना त्रास देत प्रचंड वाहतूक कोंडी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याविषयी वाहतूक नियंत्रण विभागाने त्यात लक्ष घालावे तसेच लोकप्रतिनिधींनी याविषयी आवाज उठवावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग आम्हाला पत्करावा लागेल असा इशारा दक्ष नागरिक संघटनेने दिला आहे.

याप्रकरणी आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत याकडे प्रशासनाचे लक्ष वेधू केले आहे. काही व्हिडीओ त्यांनी पोस्ट करत हे सर्व धंदे त्वरीत बंद होतील अशी आशा करतो. दरम्यान अवजड वाहनांच्या प्रवेशाची वेळ काटेकोर पाळली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यांनी आपले हे ट्विट ठाणे नवी मुंबई पोलिसांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. यावर आता प्रशासन काय भूमिका घेते हे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.