Gajanan Kirtikar: "शिवसेनेच्या 40 आमदारांमुळंच भाजप पुन्हा सत्तेत"; खासदार किर्तीकरांचा इशारा

विविध प्रकारे भाजपच्या वाढत्या दबावामुळं शिवसेनेमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे.
Gajanan Kirtikar_Devendra Fadnavis
Gajanan Kirtikar_Devendra Fadnavis
Updated on

मुंबई : शिवसेनेच्या 40 आमदारांमुळं भाजप पुन्हा सत्तेत असल्याचं विधान शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केलं आहे. भाजपच्या दबावतंत्राला उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत किर्तीकर बोलत होते. (Shiv Sena 40 MLAs put BJP back in power MP Gajanan Kirtikar gives warning to BJP)

Gajanan Kirtikar_Devendra Fadnavis
Ajit Pawar: "इतकेच लोकप्रिय आहात तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या"; अजित दादांचं CM शिंदेंना आव्हान

किर्तीकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार एकत्र आल्यानं भाजप पुन्हा एकदा सत्तेत आली आहे. शिवसेनेचे ४० आमदार सोबत होते म्हणून मविआची सत्ता उलथून टाकली, त्यामुळं या आपली ताकद ओळखावी, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

Gajanan Kirtikar_Devendra Fadnavis
Ajit Pawar Interview: PM मोदींचं भवितव्य काय? त्यांना हरवणं शक्य आहे का? अजित दादांनी स्पष्टच सांगितलं

शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायउतार केलं आणि शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर बसवलं. त्यामुळं आपण सर्वांनी एकत्र आणि ताकदीनं राहिलं पाहिजे, असा सल्लाही यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी दिला आहे.

Gajanan Kirtikar_Devendra Fadnavis
Jack Dorsey: जॅक डॉर्सी काँग्रेसच्या 'टूलकीट'चा भाग! भाजप आयटीसेलच्या प्रमुखांचा आरोप

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना विरोध दर्शवला असून याठिकाणी भाजपचाच उमेदवार दिला जाईल, असा ठरावही मांडला होता. त्यामुळं या अंतर्गत राजकारणाला वैतागून श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

तसेच काही दिवसांपासून शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यासाठी भाजप दबाव टाकत असल्याचीही चर्चा सुरु होती. या भाजपच्या दबावतंत्राला किर्तीकरांनी एकप्रकारे प्रत्युत्तर दिल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.