नवी दिल्ली : राज्यातील पत्राचाळ घोटाळा प्रकरण, शिवसेनाचा दसरा मेळावा, विरोधकांची एकजूट ते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अशा विविध मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Shiv Sena Dussehra Melava to Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Sharad Pawar speaks about that)
शिवसेनेचा दसरा मेळावा
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन दोन्ही गटांमध्ये सध्या संघर्ष पहायला मिळतो आहे. यावर शरद पवार म्हणाले की, "राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वांचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्याचा विचार करायला हवा. ते अनेकदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर हजर राहिले असतील त्यामुळं त्यांनी यावरुन वाद वाढवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे. पण मला आनंद आहे की, त्यांनी बीकेसीत जागा घेतली आणि त्यांना जागा देण्यात आली. त्यामुळं हा प्रश्न सुटला आहे त्यामुळं जी दसरा मेळाव्याची जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार पहिल्यांदा जर उद्धव ठाकरेंनी मागणी केली असेल तर त्यांच्या मागणीवर विलंब होणं योग्य नाही. त्यामुळं हा प्रश्न सामज्यास्यानं सोडवावा असं मला वाटतं.
महाविकास आघाडीनं सण का बंद केले?
सण का बंद केले याचा निर्णय महाविकास आघाडीनं केला असला तरी ते चुकीचं होतं असं मला वाटत नाही. कारण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण देशाला अपिल केलं की त्यांनी थाळी वाजवण्यापासून अनेक गोष्टी केल्या. त्यावेळी सभा, लग्न आणि सण उत्सव सर्व बंद केलं, त्यामुळं याची जाण जाणत्या राजाला असली पाहिजे पण त्यावेळी घेतलेला हा निर्णय योग्य होता. भलेही तो पंतप्रधानांनी घेतला असेल, असंही यावेळी पवार म्हणाले.
सीतारामन यांचा बारामती दौरा
कुठल्याही राजकीय पक्षाला आपलं भवितव्य मजबूत करण्यासाठी काही कार्यक्रम हाती घेणं गरजेंच आहे. त्या पक्षाला जर एखाद्या मतदारसंघाबाबत चिंता वाटत असेल तर त्याबाबत अधिक कष्ट करण काही चुकीचं नाही. पण तेच माझ्याच मतदारसंघात येत असतील तर देशाचे अर्थमंत्री येत असताना तिथल्या खासदारांनी त्यांचं स्वागत केलं याचा मला आनंद आहे. यापूर्वी अरुण जेटली आले होते, पंतप्रधान मोदी आले होते. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आले तिथं राहिले. त्यामुळं आता अर्थमंत्री येत असतील तर काही गैर नाही.
राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा'
सर्वसामान्य लोक राहुल गांधींच्या यात्रेकडं सहानुभूतीच्या दृष्टीनं बघत आहेत. माझे दोन अनुभव आहेत एक चंद्रशेखर यांच्या यात्रेत मी स्वतः सहभागी झालो होतो त्याला प्रचंड प्रतिसाद होता. त्यानंतर शेतकऱ्यांची दिंडी काढली होती. त्यात लाखो लोकांनी सहभाग नोंदवला त्याचा राजकीय फायदा देखील झाला. त्यामुळं असे उपक्रम राहुल गांधी घेत असतील आणि त्याचा राजकीय फायदा त्यांना मिळत असेल तर त्यात चुकीचं काही नाही. त्यांना आपला पक्ष विस्तारित करण्याचा प्रयत्न आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.
विरोधकांनी एकत्र यायला हवं
काँग्रेससोबत आम्ही आहोत, नितीश कुमार आहेत आणखी काही जण आहेत. त्यामुळं काँग्रेससोबत जाऊन जर आपण भविष्यात यशस्वी झालो तर देशाच्या दृष्टीनं हे लाभदायक होईल. नितीश कुमार आणि माझी भेट झाली आहे. यामध्ये देशात आज जी स्थिती आहे, त्यावर आमची चर्चा झाली. यासाठी विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ज्यांना भाजपविरोधात जर काही काम करायचं आहे तर आपल्या सर्वाचं काम आहे की त्यांना साथ देणं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.