Eknath Shinde यांच्या दसरा मेळाव्यावर संकट! आझाद मैदान परिसरात पावसाची हजेरी, शिवसैनिकांची तारांबळ

Dasara Melava: दसरा मेळाव्यावर पावसाचे विघ्न आले आहे. आझाद मैदान परिसरात पाऊस पडत आहे.
Dasara Melava
Dasara MelavaESakal
Updated on

मुंबईत आज शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आज दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधणार आहे. मात्र याआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या मेळाव्यावर पावसाचे सावट दिसून आले आहे. मुंबईतील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच आज मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे आता दोन्ही मेळावे कसे पार पडणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आझाद मैदान परिसरात पावसाला सुरूवात झाली आहे. आझाद मैदानावर एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा होणार आहे. अशातच आता पावसाने हजेरी लावल्याने सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे दसरा मेळाव्याला जमलेल्या शिवसैनिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

Dasara Melava
Dasara Melava: मुंबईत असली आणि नकली शिवसेनेचा दसरा मेळावा, मात्र शिवतीर्थावर... ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत

तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्यात पहिल्यांदा युनासेनाप्रमुख आदित्य ठाकरे भाषण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे पक्षाचे नेते देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यावेळी त्यांना पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात भाषण करण्याची संधी मिळणार आहे.

हवामान खात्याने 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असे वृत्त एएनआयने दिले आहे. IMD नुसार, तामिळनाडू, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवावर परिणाम झाला आणि अनेक भागात पाणी साचले. गुरुवारी अचानक कोसळलेल्या पावसाने अनेकांना आश्चर्यचकित केले. कारण हवामान खात्याने मुंबईत हलक्या ते मध्यम पावसासाठी फक्त 'यलो' अलर्ट जारी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.