Shiv Sena: "मनात राम आणि हाताला काम," वर्धापन दिनानिमित्त झळकले शिवसेना ठाकरे गटाचे बॅनर्स

Shiv Sena UBT: आता उद्या शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे दोन्हीकडील नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Shiv Sena UBT
Shiv Sena UBTEsakal
Updated on

19 जून रोजी शिवसेनेला 58 वर्ष पूर्ण होत असून, मंगळवारी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवलीत मोठया प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली असून, यातून भाजपला डीवचन्याचे काम करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

"मनात राम आणि हाताला काम" अशा आशयाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावत, नोकऱ्या आणि कामाचा मुद्दा पुढे आणायचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे शरहात लावलेल्या बॅनरची शहरात चर्चा देखील होऊ लागली आहे.

Shiv Sena UBT
Chhagan Bhujbal वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत काय घडलं?

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाने 9 जागा जिंकत दमदार कामगिरी केली आहे. शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे असलेल्या अनेक नेते, आमदार, खासदार त्यांना सोडून गेले होते. त्यामुळे त्यांची या निवडणुकीत कशी कामगिरी होते याकडे सर्वांचे लक्ष होते.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही समाधानकारक कामगिरी करत 7 जगांवर विजय मिळवला आहे.

आता उद्या शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे दोन्हीकडील नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Shiv Sena UBT
Ajit Pawar : ''...तर वेगळा विचार करावा लागेल'', अजित पवार गटाकडून थेट भाजपला इशारा

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या. त्यांनी 13 जागी विजय मिळवला.

यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी 9 जागा जिंकल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अवघ्या 10 जागा लढवत 8 जगांवर विजय मिळवला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागांवर यश मिळाले. तर अजित पवार यांचा पक्ष एका जागी विजय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.