मुंबई : विधानसभा कामकाज सल्लागर समितीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डावलण्यात आलं आहे. ठाकरेंकडील एकाही आमदाराला या समितीत समावेशासाठी निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यापार्श्वभूमीवर शिवसेनेनं विधानसभा अध्यक्षांना पुन्हा एकदा पत्र लिहित, सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांचा समितीत समावेश करावा अशी मागणी केली आहे. (Shiv Sena has not included in working advisory committee of VidhanSabha again letter to Speaker)
काल यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून एक पत्रक काढण्यात आलं होतं. यामध्ये एकनाथ शिंदे गटातील उदय सामंत आणि दादा भुसे यांना कामकाज सल्लागार समितीसाठी निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील एकाही आमदाराला यासाठी निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळं या समितीत नेमणूक व्हावी यासाठी गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवून समावेशाची मागणी केली होती. पण ही विनंती विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली नव्हती. त्यामळं आज पुन्हा एकदा अजय चौधरी यांनी पत्र पाठवून आमची नियुक्ती करावी, अशी मागणी केली.
दरम्यान, एकीकडे विधानसभा कामकाज सल्लागार समितीत उद्धव ठाकरे गटाला स्थान दिलेलं नसताना दुसरीकडे विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत मात्र शिवसेनेचे अंबादास दानवे आणि अनिल परब यांचा समावेश करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.