"वाजत गाजत गुलाल उधळत..." शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा धमाकेदार टीझर; ठाकरेंचा आवाज अन् फटाक्यांची आतिषबाजी, पाहा व्हिडिओ

Shiv Sena UBT Dasara Melava Teaser: शिवसैनिकांना या दसरा मेळाव्याची उत्सुकता लागलेली असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून दसरा मेळाव्याचा टीझर पोस्ट करण्यात आला आहे.
Esakal
Esakal
Updated on

दरवर्षी प्रमाणे यंदाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरील शिवतीर्थ येथे होणार आहे.

राज्यातील असंख्य शिवसैनिकांना या दसरा मेळाव्याची उत्सुकता लागलेली असतानाच आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून दसरा मेळाव्याचा टीझर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर हा टीझर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टीझरमध्ये काय?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पोस्ट केलेल्या टीझरची सुरुवात फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताषांचा आवाज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठमोऱ्या छायाचित्राने होते. पुढे यामध्ये उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, "जर विरोधकांना वाटत असेल की शिवसेना संपली, त्यांना मला दाखवायचे आहे शिवसेना काय करुन दाखवते."

पुढे या टीझरबरोबर लिहिले आहे की, "दादरमधील शिवाजी पार्क मैदानाच्या शिवतीर्थावर 12 ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सर्वांनी वाजत गाजत आणि गुलाल उधळत यावे."

Esakal
Fake Garba Passes: गरबा, 6 लाखांचे बनावट पास अन् 6 विद्यार्थी...; मुंबईतील स्टेशनरी स्टोअरमध्ये नेमकं काय घडलं?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापनेपासून सुरू केलेला हा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्क मैदानाच्या शिवतिर्थावर होते. मात्र, शिवसेना फुटल्यानंतर मुंबईत दोन्ही शिवसेनेचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे होऊ लागले आहे. शिवसेना फुटल्याच्या पहिल्या वर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष झाला होता.

यंदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महापालिकेकडे शिवाजीपार्क मैदान मिळावे म्हणून आधी अर्ज केला होता त्यामुळे ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदान मिळाले आहे.

Esakal
Sharad Pawar: शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना धक्का; नवी मुंबईतील 'हा' नेता फुंकणार तुतारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.