Abhishek Ghosalkar Firing : शिवसेना (उबाठा) नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या; राज्यात गुंडाचे राज्य, विरोधकांची टिका

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबाराच्या घटनेला आठवडा उलटला नाही तोच मुंबईत शिवसेना (उबाठा) गटाचे नेते व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
shiv sena uddhav thackeray shiv sena abhishek ghosalkar shot in mumbai opposition criticize
shiv sena uddhav thackeray shiv sena abhishek ghosalkar shot in mumbai opposition criticizeSAkal
Updated on

मुंबई: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबाराच्या घटनेला आठवडा उलटला नाही तोच मुंबईत शिवसेना (उबाठा) गटाचे नेते व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

हल्लेखोर मॉरीस नोऱ्हाना याने स्वतावर गोळी झाडून घेतली. या घटनेनंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही धाक उरला नसून राज्यात गुंडांचे राज्य सुरू असल्याची टिका विरोधकांनी केली आहे.

गुरुवारी (ता.८) अभिषेक एका बैठकीसाठी दहिसर येथील एमएचबी, आयसी कॉलनीतील मॉरीस याच्या कार्यालयात आले होते. दोघामध्ये चर्चा झाल्यानंतर अचानक मॉरीसभाई याने रिवॉल्वर काढले आणि एकुण पाच गोळ्या झाडल्या.

त्यातील तीन गोळ्या अभिषेक यांना लागल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिषेकला कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या शिवसैनिकांनी करुणा रुग्णालयात दाखल करण्यात केले.तर हल्लेखोर मॉरीसला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.अभिषेक यांना उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने काही वेळानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अभिषेक हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र आहेत.ही घटना एमएचबी कॉलनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे.या घटनेनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात.पक्षात प्रवेश देतात.तर गृहमंत्री अदृश्य झाले असल्याची टिका केली आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर करुणा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले होते. वाढता तणाव बघता रुग्णालयाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेनंतर जमलेल्या शिवसैनिकांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या जात असून याला सत्ताधाऱ्याचे पाठबळ असल्याचा आरोप केला.

'गॉड ब्लेस यू' आणि गोळीबार

दहिसरच्या मॉरीसभाई याच्या ज्या कार्यालयात ही घटना घडली तिथले सिसिटीव्ही फुजेट समोर आले आहे. या फुटेजमध्ये आरोपी मॉरीस यांच्या कार्यालयात मॉरीस नोरोन्हा व अभिषेक घोसाळकर हे दोघेही इंग्रजीत एकमेकांसोबत चर्चा करत आहे. फेसबुकवरुन हा सर्व संवाद लाईव्ह होत होता.

दोघांमधील मतभेद दूर झाले असून आता आम्ही सोबत काम करणार असल्याचे अभिषेक घोसाळकर सांगत आहेत. जनतेसाठी आम्ही सोबत मिळून चांगले काम करु असे ते सांगतात.त्यानंतर सोफ्यातून उठून जात असताना अचानक अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पहिली गोळी अभिषेक यांच्या छातीत लागली असून, दुसरी पोटात गोळी लागली आहे. त्यानंतर ते खाली कोसळतांना दिसतात. या फुटेजमध्ये एकुण पाच गोळ्या झाडल्याचा आवाज स्पष्टपणे ऐकु आला.

कोण आहे अभिषेक घोसाळकर

- उध्दव ठाकरे यांचे निष्ठावंत

- वडील विनोद घोसाळकर हे २००९,२०१४ मध्ये आमदार होते.

- अभिषेक घोसाळकर हे दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

- तरुण अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नगरसेवक म्हणून प्रतिमा

- दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर ७ चे नगरसेवक होते

- मुंबै बँकेचे संचालक

कोण आहे मॉरीस

मॉरीस हा स्वताला समाजसेवक म्हणवून घेतो. बोरीवलीत राहणाऱ्या मॉरीसला मॉरीसभाई या नावाने ओळखले जाते. लॉकडाऊन काळात मॉरीसने हजारोंना रेशन वाटप केल्याच्या काही बातम्या वेबसाईटवर प्रकाशित झाल्या आहे.लॉकडाऊन दरम्यान मॉरीसने जनजागृतीसाठी बोरीवली ते वांद्रे पर्यंत पदयात्रा केल्याचे कळते.

मॉरीसभाईची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे सांगीतले जाते.भाजपा आमदार सुनिल राणे यांचा तो जवळचा पदाधिकारी म्हणून ओळखला जात होता. आगामी महानगरपालिकेची निवडणुकीसाठी भाजपातर्फे निवडणुक लढविण्याच्या तयारीत होता असेही सांगीतले जाते. अभिषेक घोसाळकर यांचा नुकताच मॉरीस सोबत परिचय झाला होता.दोघामध्ये काही कारणावरुन वाद झाला होता. मात्र हा वाद नेमका काय होता, ते अजून स्पष्ट होत नाही.

महाराष्ट्रात काय चालले आहे.राज्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाही. रात्री अभिषेकवर गोळीबार झाला.अशीच परिस्थिती असेल तर महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे

- आदित्य ठाकरे,शिवसेना (उबाठा) नेते

राज्य गुंडांच्या तावडीत आहे.म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत.अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे.गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत. फडणवीस राजीनामा द्या

- संजय राऊत. शिवसेना (उबाठा) नेते

अभिषेक घोसाळकर यांची आज गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे.

- बाळासाहेब थोरात, कॉग्रेस नेते

एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतकं सगळं होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे.

- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते,विधानसभा

‘सागर’ बंगल्यावर बसलेल्या गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो.जिथे राजकीय नेत्यांवर उघडपणे गोळीबार होतोय तिथे जनतेच्या सुरक्षेची काय गॅरंटी असणार..?

- जितेंद्र आव्हाड, नेते, राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.