Shivadi Assembly Constituency: भाजपच्या पाठिंब्याचा होणार का मनसेला लाभ की ठाकरेंची शिवसेना पुन्हा मारणार बाजी?

Mumbai Vidhansabha Latest Update: काही दिवसांपूर्वीच भाजपने मनसेला पाठिंबा दिल्याने मनसेचे पारडे काहीसे जड झाले आहे.
Shivadi Assembly Constituency
Shivadi Assembly Constituencysakal
Updated on

मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा

Mumbai: दक्षिण मुंबईतील शिवडी हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो. या वेळी शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा विद्यमान आमदार अजय चौधरी यांच्यावर विश्वास दाखवला आहे, तर मनसेने माजी राज्यमंत्री बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवले आहे, मात्र काही दिवसांपूर्वीच भाजपने मनसेला पाठिंबा दिल्याने मनसेचे पारडे काहीसे जड झाले आहे.

ठाकरे गटाचे अजय चौधरी, मनसेकडून बाळा नांदगावकर मैदानात उतरले आहेत. महायुतीकडून नाना अंबोले यांना भाजपमधून शिवसेना शिंदे गटात घेऊन उमेदवारी देण्यात आली होती, मात्र ऐनवेळी महायुतीमधील भाजपने मनसेच्या बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिला. त्‍यामुळे शेवटी नाना अंबोले यांच्यावर अपक्ष निवडणूक लढवण्याची पाळी आली आहे. असे असले तरी ही भाजपचीच खेळी असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Shivadi Assembly Constituency
Maval Assembly constituency 2024 : पदयात्रेद्वारे आ.सुनील शेळके यांचा तळेगावमध्ये प्रचार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.