Onam Festival : केरळवासीयांचा ओणम सण मुंबईत उत्साहात साजरा

मुंबईतील सायन कोळीवाडा, धारावी, माटुंगा, किंग सर्कल, विलेपार्ले, कांजूरमार्ग आदी भागांमध्ये ओणम सण पारंपरिक पद्धतीने आजही साजरा करण्यात आला.
Onam Festival
Onam Festivalsakal
Updated on

शिवडी - केरळमध्येच नव्हे तर महाराष्ट्रात देखील इतर सणांप्रमाणे ओणम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मुंबईतील सायन कोळीवाडा, धारावी, माटुंगा, किंग सर्कल, विलेपार्ले, कांजूरमार्ग आदी भागांमध्ये ओणम सण पारंपरिक पद्धतीने आजही साजरा करण्यात येतो. ओणम हा सण चिंगम महिन्यात येतो.

मल्याळम लोक चिंगम हा वर्षाचा पहिला महिना मानतात. तर हिंदू दिनदर्शिकानुसार चिंगम महिना ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येतो. ओणमच्या पहिल्या दिवसाला ‘अथम’ आणि शेवटच्या दिवसाला ‘थिरुओणम’ असे म्हटले जाते. ओणमच्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्व आहे. या सणात लोक दहा दिवस फुलांनी घर सजवतात, फुलांची रांगोळी काढतात.

नवीन कपडे परिधान करतात विशेष म्हणजे महिला पारंपारिक पद्धतीची कसवू साडी नेसतात. तसेच विधीनुसार भगवान विष्णू आणि महाबली यांची पूजा करतात. ओणमचा हा उत्सव नवीन पिकांच्या आगमनाच्या आनंदात साजरा केला जातो. यंदा (ता.20 ते 29) ऑगस्ट दरम्यान हा उत्सव साजरा करण्यात येत असला तरी अनेक मल्याळम लोक (ता. 31) ऑगस्ट पर्यंत हा सण साजरा करणार आहेत.

ओणम या सणाची परंपरा ही फार जुन्या काळापासून चालत आली आहे. या दिवशी मल्याळम लोक केळीच्या पानात जेवण वाढतात. तसेच एकमेकांच्या भेटी घेऊन एकमेकांना शुभेच्छा देऊन या सणाचा आनंद द्विगुणीत करतात. यासाठी मुंबईत राहणारे केरळा राज्यातील सर्व जाती धर्माचे बांधव एकत्र येत शाळा, महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. यात विविध स्पर्धा, नृत्य, संगीत, महाभोज यासारख्या कार्यक्रमांचा समावेश असतो.

ओणम हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा मानला आहे. बळीराजाच्या आगमनानिमित्त व त्याच्या स्वागतासाठी ओणमचा सण साजरा करण्यात येतो. या काळात पीक कापणीचा हंगाम सुरु असतो. पावसाळा सरत आल्यावर निसर्गात सगळीकडे हिरवाईचा बहर असतो.

असे म्हटले जाते की राजा महाबली आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर अवरतो , राजाला खुश करण्यासाठी आंबट-गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. देवाला केळीच्या पानात या पदार्थांचा नैवेद्य दाखवून त्यानंतर सर्वजण भोजन करतात. तर प्रामुख्याने केरळ वासियांसाठी ओणम हा महत्वपूर्ण पर्व असून या दिवशी हा उत्सव अगदी जल्लोषाने साजरा करतात.

लोक नवीन कपड्यांची खरेदी करतात व या उत्सवासाठीचे खास पारंपरिक पद्धतीचे अनेक खाद्यपदार्थही तयार केले जातात. तसेच केरळ राज्यातील सर्वच जाती-धर्माचे लोक ओणम हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात.

या दिवशी मंदिरात आणि घरात पारंपारिक मान्यतानुसार पूजापाठ केली जाते. हा सण साजरा करण्यामागे एक ऐतिहासिक मान्यता सुद्धा आहे. राजा महाबली याच्या आदरार्थासाठी ओणम हा सण साजरा केला जातो. दक्षिण भारतातील महत्त्वाचा सण म्हणजे ओनम.

ओणम हा मल्याळी बांधवांचा मोठा सण आहे. ओणम हा उत्सव दहा दिवस साजरा केला जातो. त्यात अथम, त्यानंतर चिथिरा, चोडी, विषकम, अनीझम, थ्रिकेट्टा, मूलम, पूरदम, उथराडोम आणि यामधील शेवटचा दहावा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवसाला 'थिरुवोणम' असं म्हणतात.

'थिरुवोणम' नंतरही दोन दिवस ओणम सण साजरा केला जातो. मात्र आधीचे 10 दिवस अधिक महत्त्वाचे असतात. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवातील महत्वाचा दिवस म्हणजे ओनम. शेतकऱ्यांच्या घरी धन-धान्यांची आरास येऊ दे यासाठीही आजच्या दिवशी पूजा करण्यात येते.

केरळमध्ये ओणम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस चालणाऱ्या या सणानिमित्त घराची साफसफाई करून सजावट केली जाते. केरळ राज्यामध्ये तर नौका शर्यतीचंही खास आकर्षण असतं. याशिवाय बैलांच्या शर्यतीही आयोजित केल्या जातात.

बळीराजाच्या आगमनाचा उत्सव हा ओनमच्या स्वरुपात साजरा केला जातो. ओणम च्या दिवशी सर्व लोक नवनवीन कपडे परिधान करतात, लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी लोक पहाटे स्नान करुन देवदर्शन करतात. फुलांची रांगोळी (पुक्काळम्) हेही एक आकर्षण.

प्रत्येक घरासमोरील अंगणात, मोकळ्या जागेत फुलांची रांगोळी काढली जाते. ओणमच्या निमित्ताने पारंपरिक खाद्यपदार्थ आणि गोड मेजवानीचाही बेत आखला जातो. पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

विशेषत: केरळचे पारंपरिक नृत्य कथकली, कैकोट्टिकाली हा महिलांचा ग्रुप डान्स आणि पुलीकलीचे आयोजन केलं जातं. या दिवशी दान करणे हे विशेष मानले जाते. तसेच या दिवशी मुंबईतील अनेक साऊथ इंडियन हॉटेलमध्ये केळीच्या पानात जेवण वाढले जाते. असे सरीता बाबू के. कांजूरमार्ग यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()