Shivaji Maharaj : 'अरबी समुद्रा'तून शिवरायांना शिवराज्यभिषेक दिनी अनोखी मानवंदना!

rabian Sea
rabian Sea
Updated on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेकानिमित्त मुंबईतील भाऊचा धक्का इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली. धक्कावर तुतारी वाजवून, बोटीनचे हॉर्न वाजवून मनसेकडून शिवरायांना मानवंदना देण्यात आली आहे.

rabian Sea
शिंदें गटाच्या कार्यालयासमोरून जात होती राऊतांची गाडी; कार्यकर्त्यांनी 'असं' केलं की पोलिसांची... | Sanjay Raut

छत्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्थानाची प्रेरणा आहेत. संपूर्ण भारतात सागरी सुरक्षेचं महत्त्व ओळखून आरमाराची - नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने केली होती. अवघ्या देशात त्यांच्या या दूरदृष्टीचा दाखला दिला जातो. विशेषत: सागरी सुरक्षेच्या संदर्भात. म्हणूनच तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचा नवा झेंडा छत्रपती शिवरायांना समर्पित केला.

rabian Sea
Crime News: जन्मदाता बाप तरी कशी म्हणू तुम्हा मी? लेकीचा नराधम पित्याला सवाल

सातासमुद्रापलीकडून भारताच्या किनारपट्टीवर आलेल्या फिरंग्यांचा धोका पहिल्यांदा ओळखला तो छत्रपती शिवरायांनी आणि आपल्या कृतीतून संपूर्ण भारताला स्वराज्यासाठीच्या लढाईचा मूलमंत्रही दिला तो शिवरायांनीच. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि देशाचे स्फूर्तिस्थान असलेले शिवाजी महाराज ज्या दिवशी 'छत्रपती' बनले, त्या शिवराज्याभिषेक दिनाला तिथीनुसार २ जून रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहे.

सर्वसामान्य जनतेपासून केंद्र- राज्य सरकारपर्यंत सर्वांनाच हा ऐतिहासिक दिवस प्रेरणा देणारा आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेकडून अशा अनोख्या पद्धतीने छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेचे सरचिटणीस निशांत गायकवाड यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()