Shivaji Nalavade: मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी NCPकडून उमेदवारी जाहीर; शिवाजीराव नलावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब

यापूर्वी ठाकरेंच्या सेनेकडून मुंबई शिक्षकसाठी अन् पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
Shivaji Nalawade
Shivaji Nalawade
Updated on

मुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. यापूर्वी ठाकरेंच्या सेनेकडून मुंबई शिक्षक ज. मो. अभ्यंकर आणि पदवीधरसाठी अनिल परब यांना उमेदवारी जाहीर केली होती. (Shivaji Nalavade NCP Announces Candidate for Mumbai Teachers Constituency)

Shivaji Nalawade
Baba Ram Rahim Acquitted: बाबा राम रहिमची खून प्रकरणातून सुटका; हायकोर्टाकडून दिलासा पण...

मुंबई, नाशिक येथील दोन शिक्षक आणि कोकण, मुंबई पदवीधर मतदारसंघातील दोन अशा एकूण चार मतदारसंघांतील निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं २४ मे रोजी जाहीर केला होता. या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाच्या या नव्या कार्यक्रमामुळं राज्यात पुन्हा एकदा आचारसंहिता लागू होणार असून त्यामुळं अनेक निर्णय रखडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Shivaji Nalawade
Pune Porsche Accident: "अजित पवारांचा फोन जप्त करुन नार्को टेस्ट करा"; अंजली दमानिया यांची मागणी

याआधी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक १० जून रोजी होणार होती; मात्र, राज्य शिक्षक सेनेसह अनेक शिक्षक संघटनांनी शाळा, महाविद्यालयांची उन्हाळी सुट्टी लक्षात घेता ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्यानंतर ती पुढे ढकलली होती. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी भाजप आणि त्याविरोधात महाविकास आघाडीच्या शिवसेना आणि काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे.

Shivaji Nalawade
ठिणगी पडली! 'भुजबळांना आवरलं पाहिजे, आम्हीच का सहन करायचं?'; भाजप नेत्याची खदखद समोर

'या' सदस्यांचा कार्यकाळ संपला

विलास पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ), किशोर दराडे (नाशिक शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) या सदस्यांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

Shivaji Nalawade
Credit Card Rules: चार बँकांनी क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये केले मोठे बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम

निवडणूक कार्यक्रम असा असेल

निवडणूक अधिसूचना जाहीर - ३१ मे

उमेदवारी अर्ज दाखल करणे - ७ जून

उमेदवारांच्या अर्जांची छाननी - १० जून

उमेदवारी अर्ज मागे घेणे - १२ जून

प्रत्यक्ष मतदान - २६ जून (सकाळी ८ ते दुपारी ४)

मतमोजणी - १ जुलै

(निवडणुकीची प्रक्रिया ५ जुलैला पूर्ण होईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.