मुंबई : आगामी पालिका निवडणूक (bmc election) लक्षात घेता भाजपने शिवसेनेविरुद्ध (bjp-shivsena) जेथे जमेल तेथे आक्रमक भूमिका घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. शिवाजी पार्कवर (shivaji park) ईदच्या शुभेच्छा (Eid greetings) देण्यावरून भाजपचे मुंबई सचिव प्रतीक कर्पे (pratik karpe) यांनी मुख्यमंत्र्यांवर (cm uddhav Thackeray) टीका केली आहे; तर प्रभागरचनेवरून सुरू झालेल्या समाजमाध्यमांवरील मोहिमेलाही भाजपने पाठिंबा दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे मोगल पार्क होऊ देणार नाही, असा इशारा कर्पे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘ट्विट’द्वारे दिला आहे. शिवाजी पार्कवर दिवाळीच्या तोंडावर केलेल्या सजावटीत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्याच्या चित्रफिती समाजमाध्यांवर प्रसिद्ध झाल्या होत्या. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर १९९० मध्ये लढवलेल्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला होता.
त्या शिवाजी पार्कवर दिवाळीच्या तोंडावर ईद मुबारकच्या शुभेच्छा द्याव्यात हे कोणते हिंदुत्व आहे, असा टोलाही काही ज्येष्ठ नेत्यांनी लगावला आहे.
हिंदू सणांच्या तोंडावर एका ‘विशिष्ट समाजाला’ शुभेच्छा दिल्या जात आहेत. तुम्ही हिंदुत्व सोडले आहे, मात्र आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे मोगल पार्क होऊ देणार नाही, असा इशारा प्रतीक कर्पे यांनी ठाकरे यांना दिला.
शिवसेना चीट्स मुंबईकर
दुसरीकडे मुंबईतील प्रभाग फेररचनेविरुद्ध समाजमाध्यमांवर शिवसेना चीट्स मुंबईकर, हा हॅशटॅग वापरून नेटकऱ्यांनी सुरू केलेल्या मोहिमेलाही भाजपने पाठिंबा दिला आहे. या फेररचनेविरुद्ध मुंबई भाजपने यापूर्वीच दंड थोपटले होते. मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांची भेट घेऊन या फेररचनेचा निषेध केला होता. शिवसेना आपल्याला सोयीस्कर होईल अशाप्रकारे ही फेररचना करीत असल्याचा भाजपचा आरोप आहे. ट्विटरवर सुरू असलेल्या या मोहिमेला मुंबईकरांचा चांगलाच पाठिंबा मिळत असून जनतेचा विचार न करता शिवसेना हा बदल का करीत आहे, सत्तेसाठी शिवसेना काहीही का करीत आहे, असे प्रश्नही विचारले जात आहेत. या मोहिमेला मुंबई भाजपनेही पाठिंबा दिला असून जनभावनेचा विचार करावा, असे आवाहन त्यांच्या नेत्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.