MNS : महायुतीच्या समारोप सभेसाठी मनसेला दिले शिवाजी पार्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे नेते राज ठाकरे हे या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.
मनसे
मनसेगुगल
Updated on

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवाजी पार्क सभेसाठी मिळावे यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. मात्र मनसेला शिवाजी पार्क महायुतीच्या समारोप सभेसाठी दिले आहे. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या नगरविकास खात्याची या सभेसाठी परवागीही मिळाली आहे. येत्या १७ मे रोजी महायुतीची तोफ शिवाजी पार्कातून धडाडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे नेते राज ठाकरे हे या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. ठाकरे गटाची शिवसेना बीकेसी मैदानासाठी चाचपणी करीत असल्याचे समजते.

मनसे
Dhule Fraud News : तोतया जीएसटी अधिकाऱ्यांचा पुण्याच्या कंपनीला लाखांचा गंडा

ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला होता. मात्र मनसेला परवानगी दिल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने आता बीकेसीतील मैदानाची चाचपणी सुरु केली. मुंबईत अजूनही मोठ्या प्रचार सभा झालेल्या नाहीत. राज्यात अन्यत्र मोठ्या नेत्यांच्या सभा सुरू आहेत. आता मुंबईती लोकसभा निवडणुकीसाठी पुढील टप्प्यासाठी मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. आता सर्व राजकीय पक्ष मुंबईत दाखल होणार आहेत. त्यासाठी मुंबईतील मध्यवर्ती जागा सभेसाठी शोधण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान मोदी हे १७ मे रोजी मुंबईत येत आहेत. महायुतीच्या सभेसाठी राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क घेतले आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीच्या तोफा धडाडणार आहेत..

मनसे
Pune Crime News: येरवड्यात सोनाराच्या दुकानातून खरेदीच्या बहाण्याने वीस लाखांचे दागिने लांबवले

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले असून मतदानाला फक्त १० दिवस शिल्लक असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २० मे रोजी मतदान होणार असल्याने १८ मे प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

मनसे
Nashik News : खरीपासाठी मिळणार यंदा मुबलक बियाणे; बियाण्याचे पाकिट 853 ला

मुंबईत पुढील आठ दिवस पुढील आठ दिवस राजकीय सभांचा धुरळा उडणार आहे. मुंबईत महायुतीचा प्रचाराला वेग आला असून पालिकेच्या जी उत्तर विभागाकडे मनसेने १८ मार्च रोजी रितसर अर्ज केला होता. त्याच दरम्यान ठाकरे गटानेही १८ मे च्या सभेसाठी जी उत्तर विभागाकडे अर्ज केला होता. पालिकेच्या जी उत्तर विभागाने दोघांचे अर्ज नगर विकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मनसेला परवानगी देण्याबाबत ८ मे रोजी नगर विकास विभागाने पालिकेला कळवले. त्यानंतर ९ मे गुरुवारी पालिकेच्या जी उत्तर विभागाने मनसेला सभेसाठी मंजुरी दिली आहे.

शिवाजी पार्क मैदानासाठी पालिकेकडे ३९ दिवस व राज्य सरकारकडे सहा दिवस परवानगीचे अधिकार आहेत. सरकारने आपल्या स्तरावर निर्णय घेऊन ही परवानगी दिली असल्याची माहिती मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी दिली. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने यापूर्वीच बीकेसीसाठी एमएमआरडीएकडे अर्ज सादर केला आहे. महाविकास आघाडीची समारोप सभा १७ मे रोजी बीकेसी मैदानात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश सावंत यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.