Dasara Melava : दिव्य ज्योतींच्या प्रकाशात लखलखणार शिवाजी पार्क

शिवाजी पार्क येथे दुर्गा उत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. यंदाच्या वर्षी 'दिव्यज्योती' या संकल्पनेवर आधारित दुर्गाउत्सव साजरा केला जाणार असल्याची माहित येथील 'बंगाल क्लब'ने दिली आहे.
Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava Shivaji Park
Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava Shivaji Parkesakal
Updated on

मुंबई - शिवाजी पार्क येथे दुर्गा उत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. यंदाच्या वर्षी 'दिव्यज्योती' या संकल्पनेवर आधारित दुर्गाउत्सव साजरा केला जाणार असल्याची माहित येथील 'बंगाल क्लब'ने दिली आहे. 'बंगाल क्लब' आयोजित दुर्गोत्सवाचे यंदाचं हे ८० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. यंदाच्या वर्षी अंदाजे सुमारे १० लाख भाविक या उत्सवात सहभागी होण्यासाठी येतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त करण्यात केला आहे.

१०१ वर्षाचा समृद्ध वारसा असलेल्या बंगाल क्लब, शिवाजी पार्कच्यावतीने दरवर्षी दुर्गोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे उत्सवाचे ८८ वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी २० ते २४ ऑक्‍टोबर या कालावधीत दिव्य ज्योत आणि आरसा महलच्या संकल्पनेसह भव्य सभामंडप उजळून निघणार आहे.

यासोबतच यंदाच्या वर्षीची मुंबईतील सर्वात उंच देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. मूर्तीची उंची १९फूट इतकी असेल. या उत्सवादरम्यान बंगालची संस्कृती आणि कलेची अनोखी अनुभूती घेता येईल. दररोज धुनुची नृत्य आणि विजया दशमीच्या दिवशी सिंदूर उत्सव मोठ्या थाटात साजरा होईल.

गंगाकाठच्या मातीतून साकारली मूर्ती

मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण पुरकतेचे भान राखत यंदा मूर्तीसह पूजा मंडप पारंपारिक पद्धतीने बनवण्यात येणार आहे. यासाठी गंगा नदीच्या काठावरील मातीचा वापर केला जाणार आहे. यासोबतच पारंपरिक वाद्यांच्या सुरातच देवीचे आगमन आणि पूजा होईल. पारंपारिक ढाक्या (ढोलकी मारणारे) पूजेचा अविभाज्य भाग असणार आहेत.

आकर्षक आणि भव्य सभामंडप

दरवर्षी नितीन देसाई हा सभामंडप साकारतात. मात्र त्यांच्या निधनानंतर यंदाच्या वर्षी क्लब कला दिग्दर्शकाच्या शोधात असताना निलेश चौधरी यांनी या सभा मंडप साकारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचवेळी, यंदाच्या वर्षी 'दिव्य ज्योती मंदिर' या संकल्पनेसह ५०१ दिव्यांनी संपूर्ण मंडप सजविण्यात येणार आहे.

विजेवरील दिव्यांचा वापर सजावटीसाठी करण्यात येणार आहे. सभामंडप संपूर्ण आरसा महलने सजविण्यात येणार आहे. सभामंडपात देवीसमोर ५१ दिव्यांची रोषणाई असेल. तर आरसा महालातील आरसे आणि त्यातून दिव्याची रोषणाई यामुळे सभामंडपात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन भव्य हत्तीच्या प्रतिकृती उभारण्यात येतील. तर प्रवेशद्वार ते सभामंडप २५ झुंबर लावले जातील.

सर्वात मोठे आणि आकर्षक झुंबर देवीच्या मूर्तीवर असेल. हा मंडप उभारण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला. पावसाळ्यामुळे अधिकचे काम तीन कार्यशाळेत सुरु होते. एकूण ८० ते ९० कर्मचाऱ्यांनी या सभामंडप उभारणीत आपले योगदान दिले आहे.

सामाजिक भान वाढविणारे उपक्रम

या उत्सवादरम्यान अनेक कला सांस्कृतिक आणि इतर स्पर्धा-प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये सभामंडपाला भेट देणारे सदस्य आणि गैर-सदस्य सहभागी होऊ शकतील. याचसोबत उत्सवादरम्यान अवयवदानाचा संदेश देण्यात येणार आहे. यावेळी अवयवदान मोहिमेत सहभाग घेतं शपथ घेण्यात येईल.

नवमीच्या दिवशी कुमारी पूजा (माँ दुर्गाचे रूप म्हणून लहान मुलीची पूजा) करण्यात येईल. पूजेच्या तीनही दिवस १२,००० हून अधिक भाविकांना भोग प्रसाद देण्यात येईल. खाद्यपदार्थ आणि हस्तकलेचे प्रदर्शनही असेल ज्याद्वारे लाखो भाविक बंगालची परंपरा पाहू शकतील.

येत्या दोन ते तीन दिवसात मुखदर्शन सोहळा संपन्न होईल. बंगाल क्लब सामाजिक, सांस्कृतिक, परोपकारी आणि क्रीडा उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही दरवर्षी समाजातील विविध स्तरातील लोकांना सहभागी करून घेतो. यंदाच्या वर्षीची तयारीही अंतिम टप्प्यात आहे.

- जॉय चक्रबर्ती, प्रवक्ता, बंगाल क्लब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.