Shivdi Navha Sheva Sea Link : 'या' तारखेला सुरु होणार शिवडी - न्हावा-शेवा सी-लिंक!

Shivdi Navha Sheva Sea Link
Shivdi Navha Sheva Sea Link sakal
Updated on

Shivdi Navha Sheva Sea Link: देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून ओळखला जाणारा मुंबई ट्रान्स हार्बर म्हणजेच शिवडी ते न्हावा-शेवा सी-लिंकचा लोकार्पण सोहळा १२ जानेवारीला होणार असल्याची माहिती उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्‌घाटन होणार आहे. याचसोबत खारकोपर-उरण रेल्वेचे आणि नवी मुंबईतील बेलापूर-पेंधर या मेट्रोचेही उद्‌घाटन केले जाणार आहे.

Shivdi Navha Sheva Sea Link
Sea subway railway : भारतातील पहिला समुद्री भुयारी रेल्वेमार्ग ठाणे खाडीत! हायस्पीड रेल कॉरिडॉरमधील महत्त्वाचा टप्पा

तिसरी महामुंबईला मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत (एमएमआरडीए) निर्माण केला जाणारा एमटीएचएल हा शिवडी-न्हावा चिर्ले २१.८ किलोमीटर लांबीचा सर्वात लांब सागरी प्रकल्प पूर्णत्वास आला आहे.

अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या शिवडी ते न्हावा-शेवा सागरी सेतूची नागरिकांची प्रतीक्षा आहे. या प्रकल्पाचे जवळपास काम पूर्ण झाले आहे. खारकोपर-उरण रेल्वेचेही उद्‌घाटन होणार आहे. नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्प बेलापूर-पेंधरचेही उद्‌घाटन केले जाणार आहे, अशी माहिती आमदार महेश बालदी यांनी दिली आहे.

Shivdi Navha Sheva Sea Link
Murud Sea: मुरूडचा समुद्र किनारा होणार एकदम चकाचक ; पर्यटकांना घेता येणार आनंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.