किल्ले रायगडावर (Raigad Fort) जाण्यासाठी रोप वे'ची सुविधा आहे, परंतु ही सुविधा व्हीआयपी लोकांनीच व्यापली होती.
अलिबाग : भरदुपारी ४२ अंशापर्यंतचं तापमान, रात्रीचा प्रवासाचा थकवा यामुळं किल्ले रायगडावर (Shivrajyabhishek Sohala) आलेल्या शिवप्रेमींना उष्माघाताचा त्रास जाणवत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, १५ हजाराच्या आसपास लोक इथं उपस्थित होते.
किल्ले रायगडावर (Raigad Fort) जाण्यासाठी रोप वे'ची सुविधा आहे, परंतु ही सुविधा व्हीआयपी लोकांनीच व्यापली होती, त्यामुळं सर्वसामान्य शिवप्रेमींना (Shiva Devotees) गडाच्या पायऱ्या पायी चाढव्या लागल्या. या पायऱ्या चढून दमलेल्या वयस्कर शिवप्रेमींना उष्म्याचा जास्त त्रास जाणवला.
आरोग्य विभागानं प्राथमिक उपचारासाठी सुविधा उपलब्ध केली होती. मात्र, गडावर ज्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम झाला, त्या परिसरात शोधूनही आरोग्य सुविधा दिसत नव्हती. अखेर थकवा जाणवणाऱ्यांनी आसपास मोकळी जागा पाहून थोडी विश्रांती घेऊन थकवा व उष्माघाताचा त्रास कमी केला. गडावर चढण्यासाठी पायऱ्यांचा वापर केल्याने बहुतांश जणांना हा त्रास जाणवत होता.
रोप वेची सुविधा गडावर जाण्यासाठी आहे. मात्र, सकाळी ४ वाजल्यापासून उत्सव नियोजन समितीचे अधिकारी, पोलिस कर्मचारी यांनीच रोप वेचा सर्वाधिक वापर केला. ७ वाजेपर्यंत हे सर्वजण जात होते, त्यानंतर व्हीआयपी गडावर जाण्यास आले. साधारण ८.३० वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री एकाचवेळी रोप वे जवळ आल्याने यातून सर्वसामन्यांना रोप वेने जाण्यास मनाई करण्यात आली.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील जवळजवळ संपूर्ण मंत्रिमंडळ, त्यांचे सचिव, अंगरक्षक हे सर्व रोप वेने गेल्याने सर्वसामान्य शिवप्रेमींनी तिकीट काढूनही पायी गड चढावा लागला. यात वयोवृध्द, शारीरिक व्याधी असणाऱ्यांचाही समावेश होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.