डोंबिवली : केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे (narayan rane) यांचे मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातील व्यक्तव्यावरून शिवसैनिक (shivsena) आक्रमक झाले आहेत. नारायण राणेंच्या विरोधात डोंबिवलीत इंदिरा चौकात शिवसेनेच्या वतीने राणे यांच्या प्रतिमेला 'चप्पल मारो' आंदोलन करीत कोंबड्या उडवीत घोषणा बाजी करत आंदोलन केले. यावेळी रामनगर पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या विरोधात केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या व्यक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिकांनी राणेंच्या वक्तव्याचा निषेध करीत आंदोलन केले. डोंबिवली मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या वतीने इंदिरा चौकात आंदोलन केले. डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, उप जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली पूर्व युवा सेना अधिकारी सागर जेधे, अभिजित थरवळ,राजेश कदम, संतोष चव्हाण, कविता गावंड, वैशाली दरेकर, मंगला सुळे, राहुल म्हात्रे यांसह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदिरा चौकात शिवसैनिक जमत राणेंच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. त्यानंतर अचानक शिवसैनिकांनी कोंबड्या आणून त्या उडविल्या, कोंबड्या आणताना पोलीस आणि सैनिकांत झटापट झाली. त्यांना डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या पथकाने रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसैनिकानी राणेंच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन केले यादरम्यान पोलीस आणि शिवसैनिकांत झटापटी झाली. पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले यावेळीही पोलिसांची गाडी अडविण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.