ShivSena Anniversary: शिवसेनेचा 57वा वर्धापनदिन होणार साजरा; शिंदे गटाकडून टिझर लॉन्च

शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचा वर्धापन दिन दोन गटांकडून साजरा केला जाणार आहे.
Shivsena
Shivsena
Updated on

मुंबई : शिवसेनेचा 57वा वर्धापनदिन 19 जून रोजी साजरा होणार आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं वर्धापन दिनाचा कार्यक्रम जाहीर केला असून गोरेगाव इथल्या नेक्से एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.

याचा टिझर देखील रिलीज करण्यात आला आहे. या टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. (ShivSena 57th anniversary to be celebrated by Eknath Shinde group teaser launch)

शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचा वर्धापन दिन दोन गटांकडून साजरा केला जाणार आहे. येत्या १९ जून १९६६ मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेचा यंदा ५७ वा वर्धापन दिन असणार आहे. या कार्यक्रमाला तीनच दिवस बाकी असताना शिंदे गटानं आपण वर्धापन दिन सोहळा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. हा कार्यक्रम गोरेगाव पश्चिमच्या नेक्सो एक्झिबिशन सेंट्रमधील हॉल क्रमांक ४ मध्ये सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. (Latest Marathi News)

Shivsena
Cyclone Biporjoy: 94 प्राण्यांचा मृत्यू, 34 लोक जखमी अन्...; चक्रीवादळानं केलंय गुजरातमध्ये मोठ नुकसान!

या मेळाव्याला शिवसेना नेते, पदाधिकारी, सामान्य शिवसैनिक वर्धापनदिनानिमित्त एकत्र येत आहोत. त्या दिवशी धर्मवीर आनंद दिघेंची शिकवण आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जागर होणार आहे, असं या निमित्त प्रसिद्ध केलेल्या टिझरमध्ये म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Shivsena
Jammu Kashmir: कुपवाडात एलओसीवर धुमश्चक्री; 5 दहशतवाद्यांना कंठस्नान

दरम्यान, उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात असल्यानं अद्याप त्यांच्या शिवसेनेकडून वर्धापनदिनाबाबत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. पण ठाकरे गटाकडूनही वर्धापन दिन जरी साजरा होणार असला तरी यंदा दोन कार्यक्रम जर घोषीत झाले तरी त्यांचे पक्ष कार्यक्रम मात्र वेगळे असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.