डोंबिवली : मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात, बोलीभाषेत (Marathi Bhasha Din) आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. मराठी भाषा प्रथम आपण आत्मसात केली पाहिजे, तिचा वापर केल्यावर आपसूक ती वाढेल. प्रयत्न आपण केले पाहिजे राजकारणी त्यांचे त्यांच्या पध्दतीने काम करत असतात असे प्रतिपादन मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केले. दरम्यान, कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपमध्ये (Shivsena-bjp disputes) सुरू असलेल्या वादावर ते म्हणाले, मागे घशात हात घालून दात काढले आता एकमेकांचे कपडे फाडत आहे. शिवसेना भाजपने कल्याण - डोंबिवली शहरासाठी (kalyan-dombivali) काहीही केलं नाही. अशा शब्दांत पाटील यांंनी टीकेची तोफ विरोधकांवर डागली.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत डोंबिवलीत मनसेच्या वतीने एक दौड जवानांसाठी व प्रभागा प्रभागात मराठी स्वाक्षरी मोहीम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रनर्स क्लेन संस्थेतील 100 धावपट्टू यात सहभागी झाले होते. गेट वे ऑफ इंडिया येथून रात्री 12 वाजता त्यांनी धावण्यास सुरुवात केली. मुंबई ते डोंबिवली असे 65 किमी अंतर कापत त्यांनी ही धाव रविवारी सकाळी 9 वाजता पूर्ण केली.
या उपक्रमातून जमा होणारा निधी हा जवानांसाठी दिला जाणार आहे. धाव मध्ये सहभागी खेळाडूंचा यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डोंबिवली शहर प्रमुख मनोज घरत, प्रकाश भोईर, मंदा म्हात्रे, संदीप म्हात्रे, योगेश पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांनी जवानांसाठी आता धावले आहेत, निवडणूक जवळ येत आहे तर एक धाव मतदानासाठी पण मारा असे आवाहन नागरिकांना केले.
पत्रकारांशी बोलताना सध्या कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजप मध्ये सुरू असलेल्या वादावर ते म्हणाले, मागे घशात हात घालून दात काढले आता एकमेकांचे कपडे फाडत आहे. शिवसेना भाजपने शहरासाठी काही केलं नाही. निवडणुका पाहून लोकांना आकर्षित करण्यासाठी भांडत आहेत. मात्र लोक सुज्ञ आहेत, ते या वेळेस विचार करतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.