ठाणे : शिवसेना-राष्ट्रवादीत श्रेयवादावरुन पुन्हा संघर्षाची ठिणगी

NCP-Shivsena
NCP-Shivsenasakal media
Updated on

ठाणे : पालिका निवडणूक (Thane Municipal corporation) एकत्र लढविण्याच्या आणाभाका घेणाऱ्या राष्ट्रवादी-शिवसेनेमध्ये (NCP-Shivsena dispute) पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली आहे. पाचपाखाडी, सावरकर नगर येथील म्हाडाच्या सोसायट्यांच्या लीज रेंट आणि एनए कराचा प्रश्न मार्गी लागला आहे. हे प्रश्न आपल्यामुळेच सुटल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी थेट माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांना लक्ष्य केले. बारटक्के फुकट श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचे परांजपे यांनी म्हटले आहे.

NCP-Shivsena
मुंबई : विमानतळ जागेवरील झोपडीधारकांचे पुनर्वसन

आनंद परांजपे म्हणाले की, नागरिकांचे लीज रेंट आणि अकृषिकर (एनए) प्रश्न आपण मार्गी लावल्यानंतर आता शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के हे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. नागरिकांना दिलासा देण्यासाठी अमित सरय्या आणि मयूर शिंदे यांनी प्रचंड पाठपुरावा केला होता. मात्र, दुर्दैवाने ‘नाच ना जाने अंगण तेढा’ याप्रमाणे राष्ट्रवादीचे काम मग श्रेयदेखील राष्ट्रवादीचे. मात्र, लोकांच्या वरातीत फुकटचे नाचायचे असे उद्योग दिलीप बारटक्के यांच्याकडून केले जात आहेत.

पाचपाखाडी, सावरकरनगर भागामध्ये म्हाडाच्या ११० सोसायट्या आहेत. या सोसायट्यांच्या जमिनीची मालकी अद्यापही म्हाडाकडे आहे. तसेच, स्थानिक नागरिक एनए कर भरण्यास तयार आहेत. मात्र, त्यावर तसेच लीज रेंटवर व्याज आकारण्यात येत असल्याने नागरिकांना ही रक्कम भरणे त्रासदायक ठरत होते. ही बाब स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक अमित सरय्या यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सरय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रश्न निकाली लावला आहे. मात्र, याचे श्रेय सेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के हे घेत असल्याने स्थानिक नागरिकांसोबत परांजपे आणि अमित सरय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन बारटक्के यांचा समाचार घेतला. या वेळी मयूर शिंदेही उपस्थित होते.

NCP-Shivsena
रायगडमधील पर्यटन वीस टक्क्याने महागले; निवास व्यवस्थाही न परवडणारी

अमित सरय्या म्हणाले की, लीज रेंट आणि एनए करावरील व्याज-दंड माफ केला आहे. आता केवळ नागरिकांना मुद्दल अदा करावे लागणारे आहे. मी सावरकरनगरसाठी केलेल्या पाठपुराव्याचा लाभ सबंध ठाणे शहरातील म्हाडा वसाहतींना झाला आहे. मात्र शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी पत्रके वाटून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आयत्या बिळावर नागोबा बनण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.

नरेश म्हस्के यांनी शिवसेनेची संस्कृती बदलली

पूर्वी दुसऱ्याचे श्रेय लाटण्याची संस्कृती शिवसेनेमध्ये नव्हती. मात्र, नरेश म्हस्के हे जिल्हाप्रमुख झाल्यापासून शिवसेनेमध्ये दुसऱ्याचे श्रेय घेण्याची संस्कृती वाढीस लागली आहे. काम दुसऱ्याचे आणि बॅनर स्वत:चा लावायचा, असे प्रकार ते करीत आहेत. कलियुगातील नारद आहेत ते, असा टोला आनंद परांजपे यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.