Dasara Melava: शिंदेंच्या दसरा मेळाव्यात जळगाव स्पेशल शेवभाजी, खुद्द मंत्री महोदयांचा स्वयंपाकाला हातभार

जळगावातून २०० हून जास्त गाड्या आझाद मैदानात दाखल; कार्यकर्त्यांच्या जेवणाच्या सोयीकडे गुलाबराव पाटलांचं लक्ष
Dasara Melava
Dasara MelavaEsakal
Updated on

आझाद मैदानात पार पडणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जळगावातून २०० हून जास्त गाड्या आझाद मैदानात दाखल होत आहेत. या मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांच्या जेवण-खाण्याची व्यवस्था खुद्द पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. प्रत्येक शिवसैनिकासाठी जळगावची प्रसिध्द अशी जळगावची स्पेशल शेवभाजी, भाकरी आणि पापड गुलाबराव पाटील यांनी बनवली आहे.

यासाठी जळगाववरून कारागिर देखील आणण्यात आले आहेत. यावेळी जेवण बनत असताना गुलाबराव पाटील यांनी देखील मदत केली आहे. येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांची काळजी ते घेत आहेत, त्यांच्यासाठी जेवण-खाण्याची सोय त्यांनी त्यांच्या बंगल्यावर केली आहे.

Dasara Melava
Nilesh Rane: "आता राजकरणात मन रमत नाही", दसऱ्या दिवशी निलेश राणे यांचा सक्रीय राजकारणाला जय महाराष्ट्र !

यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, या गाव खेड्यातील लोकांनी मला निवडून दिल्याने माझ्यासारखा माणूस मंत्री म्हणून या बंगल्यामध्ये बसला आहे. त्यामुळे आज दसऱ्याच्या निमीत्ताने ते माझ्याकडे आले आहेत. म्हणून आज त्याच्यासाठी जळगावची स्पेशल शेवभाजी, चपाती, पापड हे बनवलं आहे. आंनद इतकाच आहे की, ज्याच्या उपकारामुळे आम्ही इथे आहोत, आज त्यांना दोन घास खावू घालण्याची संधी आम्हाला मिळाली आहे, असं पाटील म्हणाले आहेत.

Dasara Melava
Prajakta Mali: प्राजक्ता माळी RSS च्या दसरा मेळाव्यात सहभागी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "आयुष्यात पहिल्यांदा.."

शिंदे गटाच्या मेळाव्याला जाताना गाडीचा अपघात; एकाचा मृत्यू ३ जण जखमी

शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी अनेक नेते, पदाधिकारी, शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. याच मेळाव्यासाठी मुंबईला जात असताना शिवसैनिकांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत.

कवटेमहाकांळ तालूक्यातून जात असताना रत्नागिरी नागपूर महामार्गावरील शिरढोण गावाजवळ हा अपघात झाला आहे. एका ट्रकने पदाधिकाऱ्यांच्या गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. शिंदे गटाच्या युवासेनेचे पदाधिकारी होते अशी माहिती समोर आली आहे.

Dasara Melava
Manoj Jarange : सरकारकडून मनोज जरांगेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न; गिरीश महाजनांनी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.