Uddhav Thackeray Dasara Melava: उद्धव ठाकरे म्हणाले, लाव तो व्हिडिओ अन् उपस्थितांना दिली शपथ; दसरा मेळाव्यात काय घडलं?

Uddhav Thackeray Dasara Melava Marathi News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray ESakal
Updated on

Uddhav Thackeray Dasara Melava: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये एक व्हिडिओ लावायला सांगितला, त्यानंतर मेळाव्याला उपस्थिती लावलेल्या लोकांना एक शपथ दिली. मेळाव्यात नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Dasara Melava: राज्य माता गाय झालीये... आर्यन खानचं नाव घेत गोरक्षकांवर भडकले उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला प्रामुख्यानं लक्ष्य बनवलं. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोरक्षक आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशांवर सडकून टीका केली. त्याचबरोबर आपण मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानुसार राज्याचा कारभारही केला, असं सांगताना त्यांनी आपल्या शपथविधीचा व्हिडिओ मेळाव्यात लावायला सांगितला.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Dasara Melava: सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदीर बांधणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

या व्हिडिओनंतर ठाकरेंचं सुमारे पाऊण तास चाललेलं भाषण संपवताना त्यांनी उपस्थितांना एक शपथ दिली. यामध्ये त्यांनी महायुतीचं सरकार राज्यात का नको हे सांगणारे मुद्दे मांडले. यामध्ये महिलांची सुरक्षा, रोजगार, उद्योगांचं स्थलांतर, जातीय सलोखा यांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.