Mumbai News : सुधीर मोरे यांच्या आत्महत्येने शिवसेनेत हळहळ

शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक आणि रत्नागिरी जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर आणि विद्याविहार दरम्यान रेल्वे रुळावर मिळाला.
Former Mla Sudhir More
Former Mla Sudhir Moresakal
Updated on

मुंबई - शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक आणि रत्नागिरी जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर आणि विद्याविहार दरम्यान रेल्वे रुळावर मिळाला आहे. त्यांनी आत्महत्या केली असून आत्महत्येचे गूढ विक्रोळी पार्कसाईट विभागात कायम आहे. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

सुधीर मोरे हे गुरूवारी रात्री 12 वाजेपर्यंत गणेशोत्सवाच्या मिटींगमध्ये होते. त्यापूर्वी माजी नगरसेवक तुकाराम पाटील यांच्या वाढदिवस होता. त्यातही त्यांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या होत्या. रात्री आपल्या खासगी अंगरक्षकांना वैयक्तीक कामासाठी आहेत असे सांगून बाहेर पडले. ते रिक्षातून बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्यासोबत कुणीच नव्हते.

त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घाटकोपर स्टेशनच्या फास्ट ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळला आहे. लोकल ट्रेनच्या मोटरमनला कुणीतरी ट्रॅकवर झोपल्याचं लक्षात आले, त्याने वेग कमीही केला होता. मात्र काही उपयोग झाला नाही. लोकल त्यांच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी आपले आयुष्य संपविले.

विक्रोळी पार्कसाईट भागातून सुधीर मोरे यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली आहे. ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 2017 मध्ये त्यांनी भावाची पत्नी स्नेहल मोरे यांना निवडून आणले होते. विक्रोळी पार्क साईट हा त्यांचा मतदार संघ होता.

रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी ती योग्य रित्या पार पाडली. ते निष्ठावान शिवसैनिक होते. ईशान्य मुंबईचे माजी विभागप्रमुखही होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांची त्यांनी साथ सोडली नाही. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.