मुंबई: शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावलं आहे. सिटी सहकारी बँकेत घोटाळा केल्याचा आनंदराव अडसूळ यांच्यावर आरोप आहे. चौकशीसाठी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले होते. अखेर तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचवेळी अडसूळ यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे. (ED issues summons to Anandrao Adsul)
अडसुळांवर काय आरोप आहे?
'सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होते. जवळपास ९ हजार खातेधारक होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी एफआयआर दाखल झाला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे ही चौकशी केली नव्हती', असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यानंतर आनंदराव अडसूळ यांची ईडीची चौकशी सुरू झाली आहे.
अडसुळांनी फेटाळले आरोप -
सिटी कोऑपरेटिव्ह बँकेत ९८० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी फेटाळून लावला आहे. सीटी बँकेत ८०० कोटींची उलाढाल होती. मग, ९८० कोटींचा घोटाळा कसा काय होऊ शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आज सकाळीच ईडीचे अधिकारी माझ्या घरी आलेत. त्यांनी मला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्याचे स्वतः अडसूळ यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.