Mumbai News : शिवसेना नेता चंद्रशेखर जाधव हल्ला प्रकरण; आरोपी आनंद फडतरेला जामीन मंजूर

2019 साली खुनाचा प्रयत्न आणि खंडणीच्या आरोपा मध्ये विक्रोळी पोलिसांनी अटक केलेल्या आनंद फडतरेला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Court
Courtesakal
Updated on

मुंबई - 2019 साली खुनाचा प्रयत्न आणि खंडणीच्या आरोपा मध्ये विक्रोळी पोलिसांनी अटक केलेल्या आनंद फडतरेला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. फडतरे यांनी वॉण्टेड गुंड प्रसाद पुजारीच्या सांगण्यावरून शिवसेना नेते चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

या प्रकरणी फडतरे यांच्यावर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) कायद्या अंतर्गत कारवाई केली होती. न्यायमूर्ती जी.ए.सानप यांच्या खंडपीठाने यांनी शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे. गुंड प्रसाद पुजारीच्या थेट संपर्कात फडतरे असल्याचे सूचित करणारा कोणताही पुरावा नसल्याचे न्यायलयाने नमूद केले.

जामीन अर्जाला विरोध करताना, सरकारी पक्षाने फडतरे यांच्या मोबाईल फोन कॉल डेटा रेकॉर्ड सीडीआरचां न्यायालयात तपशील दिला होता. तथापि, उच्च न्यायालयाने, केवळ सीडीआर जामीन मंजूर करण्यात अडथळा ठरू शकत नसल्याचे मत न्यायलयाने नोंदवले. या प्रकरणात प्रसाद पुजारीच्या आई इंदिरा यांनाही जामीन मंजूर झाल्याचा युक्तिवाद करत फडतरे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.

Court
Mumbai News : पालिकेतील सुरक्षा रक्षकाने पटकावले शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक

याव्यतिरिक्त, सहआरोपींच्या कथित कबुलीजबाबात प्रत्यक्ष हल्ल्यात किंवा फडतरे यांच्या तयारीत कोणतीही भूमिका नसल्याचा दावा आरोपीच्या वकिलांना कोर्टात केला. परंतु आरोपी फडतरे संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचे सदस्य असून त्यांचा थेट सूत्रधार म्हणून गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप करत सरकारी वकिलांनी जामीन अर्जाला विरोध केला.

एफआयआरनुसार, साल 2019 साली गुंड प्रसाद पुजारी यांनी तक्रारदाराकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली केली होती. शिवसेना नेता चंद्रशेखर जाधव यांनी 10 लाख रुपये देण्याचे कबूल केले. मात्र, ही रक्कम देण्यास असमर्थ ठरल्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.