मुंबईः विधान परिषदेच्या उपसभापती पदी डॉ. निलम गोर्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोऱ्हे यांचं अभिनंदन केलं आहे. तर भाजपनं या निवडणुकीच्या विरोधात उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. ही निवडणूक होऊ नये ही विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी सभापतींनी फेटाळली आहे.
निलम गोऱ्हेंची बहुमतानं ही निवड झाली आहे. निवडणुकीवर बहिष्कार टाकून भाजपनं सभात्याग केला. महाविकास आघाडी सरकारची भूमिका हट्टाची असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. तसंच निवडणुकीच्या अधिकारापासून सरकारनं वंचित ठेवलं. महाविकास आघाडी सरकारला कामकाज रेटायचं असून उपसभापती निवडीवर आमचा आक्षेप कायम असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.
सभापती रामराजे निंबाळकर यांनी निलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून घोषणा केली आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला आणि त्याला शेकाप जयंत पाटील यांनी मंजुरी दिली. त्यानंतर सभापतींनी निलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा केली. भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून विद्यमान उपसभापती अर्थात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.
आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवड करू नये', अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली होती. मात्र सभापतींनी, कोर्टात भाजप गेली आहे, कोर्टाने मला अद्याप काही कळवले नाही. त्यामुळे तुम्ही काय मागणी केली आहे, हे मान्य करणार नाही. विधिमंडळाला कोर्टाला आदेश देण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे सभापती म्हणून निर्णय मी घेईल अशा शब्दात सभापती निंबाळकर यांनी दरेकर यांना फटकारलं आहे.
भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाई गिरकर सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर आमदारपदी नियुक्त झालेत. गिरकर यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदही भूषवले असून याआधी राज्यमंत्रिपदाची धुराही सांभाळली आहे.
Shivsena Leader Dr Neelam Gorhe elected Vidhan Parishad Deputy Speaker
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.