पुणे महापालिकेने काल अमानवीय काम केलं - संजय राऊत

'महाराष्ट्राच्या परंपरेला हे शोभणारे नाही'
sanjay raut
sanjay raut
Updated on

पुणे: पुणे महानगरपालिकेने काल आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण केलेल्या झोपड्यांवर (action on slum) कारवाई केली. या कारवाईवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पुणे मनपाने (Pune corporation) काल जे अमानवीय काम केलं, त्याचा निषेध करतो. घाईघाईने निर्णय घेतला. कुणाचीही पर्वा न करता बुलडोझर फिरवला. लोकांना बेघर निराधार केलं. आक्रोष पाहून माणुसकी दाखवली पाहीजे असं वाटलं, असे संजय राऊत (sanjay raut) म्हणाले. (shivsena leader & mp sanjay raut slam pune corporation over action against slums)

"महाराष्ट्राच्या परंपरेला हे शोभणारे नाही. मनपात सत्ता कुणाची ते सोडा, प्रशासनाने इतकं कठोर होता कामा नये. वतनदारांनी भयंकर पद्धतीने वागणे हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देणारं आहे" असं संजय राऊत म्हणाले.

sanjay raut
मुंबई: फोर्ट परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळला

"पुढची तीन वर्ष उद्धव ठाकरे सरकार चालणार आहे. यंत्रणांचा वापर करून कुणाला वाटत असेल की, सत्ता मिळेल तर ते अंधारात चाचपडत आहेत. हे सगळं सत्ताप्रेरित आहे. सीबीआय, ईडी तुमचे कार्यकर्ते आहेत का ? ईडी आणि सीबीआयची बदनामी होतेय" असे राऊत यांनी सांगितले.

sanjay raut
रेल्वे पोलिसाची चपळाई; धावत जाऊन वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण

"शरद पवारांचं महत्व वाढवण्याची गरज नाही. ते देशातील प्रमुख नेते आहेत. पंतप्रधानही त्यांचा सल्ला घेतात असे राऊत म्हणाले. काश्मीरला अमन आणि शांती गरजेची आहे. मिटिंग झाली ती गरजेची होती. इमरजेंसीला विसरा आत्ता, त्याचा बाऊ करू नये. इंदिरा गांधी यांनी डायरेक्ट इमरजेंसी लावली, आता इंडायरेक्ट वाटतं" असं राऊत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()