पत्रावर पत्र! भाजपनंतर आता प्रताप सरनाईकांचं राज्यपालांना पत्र

pratap sarnaik
pratap sarnaik sakal media
Updated on

भायखळा वीरमाता जिजामाता भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीच्या बागेत परदेशातून प्राणी आणण्याच्या निविदांमध्ये तब्बल १०६ कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा गौफ्यस्फोट भाजपाने केला होता. या मुद्द्यावरून भाजप नेते (BJP) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर टीका केली.

यासंदर्भात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं असून संपूर्ण प्रकरणात जातीने लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता पत्रांची मालिकाच सुरू झाली आहे. यावर खुलासा कर प्रताप सरनाईक यांनीही राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. (Pratap Sarnaik writes letter to Governor Bhagatsingh koshyari)

राज्य सरकारनं प्रताप सरनाईक यांना करातून सुट दिली असून त्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्याचा मनसुबा भाजपचा आहे. यासाठी लोकायुक्त आणि हायकोर्टातही दाद मागणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पुन्हा स्पष्ट केलं. त्यानंतर सरनाईकांनी राज्यपालांकडे खुलासा पाठवला आहे.

भाजप लोकप्रतिनिधींनी कशा पद्धतीने महसूल बुडवला याची तक्रार त्यांनी केलीय. या पत्रात किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान यांनी कांदळवनची कत्तल केली, CRZ कायद्याचे उल्लंघन करून स्वछतागृह बांधलं, असा आशय नमूद करण्यात आला आहे. तसेच स्थानिक रहिवाशांसाठी संघर्ष करत असताना फक्त शिवसेना आमदार म्हणून माझ्याविरोधात तक्रार करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.

सरनाईकांच्या पत्रातील आरोप

  • भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी आपले घर SRAमध्ये दाखवून मोठं घर लाटले

  • महापालिकेचे स्विमिंग पूल BOT तत्वावर घेऊन पाणी चोरी करत असून , भाजप नगरसेवक निधी मधून मेन्टेन करत आहेत. भावाची जिम अनधिकृत आहे. तो महसूल बुडवत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

  • आतापर्यंत भाजप प्रतिनिधींनी महसूल बुडवल्याची अनेक तक्रारी या पत्रात असून त्यासोबत पुरावे जोडण्यात आले आहेत.

  • लोढा उद्योग समूह, टाटा उद्योग समूह तसेच मायकल जॅक्सन साठी विजक्राफ्ट संस्थेला सरकारने दंड माफ केल्याची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.