मुंबईत रंगशारदाबाहेर आता राजकीय नाट्य रंगायला सुरवात झालीये. कारण, रंगशारदामध्ये शिवसेनेचे जे आमदार राहत होते त्यांना अज्ञातस्थळी हलवण्याच्या मोठ्या घडामोडी मुंबईतील घडताना पाहायला मिळतायत. शिवसेनेचे आमदार फुटू नये म्हणून शिवसेनेने आता मोठी तटबंदी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. रंगाशारादा बाहेर 2 आलिशान बसेस उभ्या आहेत आहेत.
आज मागील सरकारचा शेवटचा दिवस आहे. अशातच आज मुख्यमंत्र्यांना तांत्रिक कारणास्तव राजीनामा द्यावा लागू शकतो. अशातच फोडाफोडीचा घोडेबाजार होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शिवसेना आमदारांना सुरक्षित आणि अज्ञातस्थळी हलवण्याच्या घडामोडींना आता मुंबईत प्रचंड वेग आलाय.
शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वतः या बसेस बद्दल खुलास केलाय. मात्र या आमदारांना नेमकं कुठे नेलं जाणार आहे ही माहिती समजू शकलेली नाही. रंगशारदावरील व्यवस्था नीट नसल्याचं त्यांनी कारण दिलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या सर्व आमदारांना आता मुंबईतील मालाड मधील एका रिसाॅर्टवर नेणार असल्याचं समजतंय. त्याचसोबत कदाचित या सर्व आमदारांना ठाण्यात देखील नेलं जाऊ शकतं अशी देखील चर्चा आहे.
शिवसेना भवनातील सर्व जिल्हाप्रमुखांची अत्यंत महत्त्वाची बैठक संपल्याची माहिती आता समोर येतेय. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय. दरम्यान, खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे रंगशारदावर पोहोचण्याची शक्यतादेखील वर्तवली जातेय.
"साहेब आता तडजोड करू नका, मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा" अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या आमदारांची असून आपली भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती या बैठकीत आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पुढील भूमिका ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी आमदारांचं म्हणणं ऐकून घेतलं. यावेळी आमदारांनी "साहेब आता तडजोड करू नका,मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा" अस सांगितलं.
WebTitle : shivsena MLS will be shifted to unknown place
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.