मुंबई: केंद्रामध्ये मंत्री पद मिळाल्यावर शरद पवारांनी (sharad pawar) फोन केला. मात्र उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) फोन केला नाही, म्हणून नारायण राणे (narayan rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा काय प्रतिक्रिया त्यांनी दिली याची आठवण करावी, कोणत्या शब्दात अभिनंदन केलं ते सांगावं. संकुचित आणि कुत्सित ही दोन उपाधी घेऊन वावरत असतात" असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार अरविंद सावंत (arvind sawant) यांनी नारायण राणेंना दिलं आहे. (Shivsena mp arvind sawant slam narayan rane over his comment on cm uddhav thackeray)
"बाळासाहेब ठाकरे देखील शरद पवारांवर टीका करायचे. पण त्या टीकेला स्टेटस होतं. पण आता ज्या पद्धतीने भाषा वापरतात त्या बद्दल कुणाला आदर आणि आनंद वाटेल" असे अरविंद सावंत म्हणाले. "कॅबिनेटमध्ये काम करताना काय होतं हे कळेल आता त्यांना, त्या ठिकाणी सचिव नसतो त्यामुळे नक्कीच कळेल" असे अरविंद सावंत म्हणाले.
"केंद्रात त्या लोकांना डमी लोक हवे आहेत. शिवसेनेवर प्रहार करणे यासाठी त्यांचा वापर केला जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकण नाही तीन-चार आमदारांचां फक्त जिल्हा आहे. रत्नागिरी, ठाणे, मुंबई या ठिकाणी कोणाचे आमदार आहेत? राणेंना सिंधुदुर्ग पलीकडे कोण विचारतो आणि त्यांचा मुलगा शिकलाय अन्यथा त्या ठिकाणी भगवा फडकला असता" असे अरविंद सावंत म्हणाले.
"शिवसेनेला कॉर्नर करणे हा त्यांचा स्वतःचा गैरसमज आहे. त्यांना भाजपात प्रवेश मिळवताना उमेदवारी देणं. त्यांच्या मुलांना उमेदवारी देणं. शिवसैनिकांना पाडण्याचा प्रयत्न करणार हे सगळं विधानसभेत त्यांनी केलं. हे सगळं करणारा तू आणखीन काय अपेक्षा करणार तरीदेखील शिवसेना चांगली होती तेरड्याचा रंग तीन दिवस" अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.