'काल प्रसाद दिला, आता शिवभोजन थाळी द्यायला लावू नका'

शिवसेना स्टाईलने चोख उत्तर देणार
MP Sanjay Raut
MP Sanjay RautMP Sanjay Raut
Updated on

मुंबई: "शिवसेना भवनावर (shivsena bhavan) हल्ला करण्याची हिम्मत कोणाची नाही, काल आलेले लोक कशासाठी होते? त्यांचा संबंध काय? शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. अशांवर चोख उत्तर हे शिवसेना स्टाईलने दिलं जाईल हे मी रेकाँर्डवर बोलत आहे" असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) म्हणाले. काल शिवसेना भवनजवळ शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. (Shivsena mp sanjay raut warn bjp over yesterday clash)

"राम मंदीराविषयी सामनात काय लिहिलंय हे नीट वाचलं का ? तुम्हाला लिहिला वाचता येत का? आमचे प्रवक्ते काय बोलले ते बघ, जे आरोप झाले त्याची चौकशी करा, जे आरोप बदनाम करण्यासाठी केले असतील त्यावर पण कारवाई करा असे आम्ही म्हणालो. त्यावर मिरच्या का झोंबाव्या? राम मंदिराच्यावर बीजेपीचे कार्यकर्ते आहेत का? खुलासा विचारणे गुन्हा आहे का ? ज्यांनी काल प्रयत्न केला त्याला शिवसैनिकांनी प्रसाद दिला आहे, शिवभोजन थाळी द्यायला लावू नका" असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

MP Sanjay Raut
'भाजपच्या सो कॉल्ड नेत्यांनी फक्त वेळ आणि तारीख सांगावी'

"आरक्षण विषय नाजूक झालाय, आरक्षण बाबतीत एक राष्ट्रीय धोरण केंद्र सरकारला बनवावे लागेल, म्हणून मुख्यमंत्री पंतप्रधान यांना भेटले होते, त्यांना निर्णय घ्यावा लागेल" असे संजय राऊत यांनी सांगितले.

MP Sanjay Raut
प्रदीप शर्मांच्या घरावर NIA चा छापा, भाजपा नेते म्हणतात...

प्रदीप शर्मांच्या निवासस्थानी झालेल्या छापेमारीच्या कारवाईवर ते म्हणाले की, "पोलिसी कारवाई असेल, मला माहित नाही, या संदर्भात गृहमंत्री, पोलीस आयुक्त बोलू शकतील, त्या विषयी मला माहीत नाही, मी कसे बोलणार?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.