ShivSena Melava : संजय राऊतांच्या नावाची राखीव खुर्ची; व्यासपीठानं वेधलं लक्ष

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत सध्या ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.
ShivSena Melava : संजय राऊतांच्या नावाची राखीव खुर्ची; व्यासपीठानं वेधलं लक्ष
Updated on

मुंबई : शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा मुंबईतील नेस्को सभागृहात आज पार पडत आहे. या मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. यातील खास बाब म्हणजे व्यासपीठावर खासदार संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची राखीव ठेवण्यात आली आहे. यामुळं व्यासपीठानं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. (ShivSena Nesco Hall Melava Reserved chair in name of Sanjay Raut)

ShivSena Melava : संजय राऊतांच्या नावाची राखीव खुर्ची; व्यासपीठानं वेधलं लक्ष
Kerala : सावरकरांच्या पोस्टरवर लावलं म. गांधींचं पोस्टर; व्हिडिओ व्हायरल

मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानं राऊत सध्या ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यांनी जामीनासाठी देखील अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज कोर्टानं फेटाळला.

ShivSena Melava : संजय राऊतांच्या नावाची राखीव खुर्ची; व्यासपीठानं वेधलं लक्ष
भाजपच्या ऑपरेशन लोटससाठी CBI-ED एकत्र काम करताहेत - सिसोदिया

दरम्यान, ईडीनं कालच पत्राचाळ प्रकरणी ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं यामध्ये या घोटाळ्याचा सूत्रधार म्हणून संजय राऊत यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळं संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ShivSena Melava : संजय राऊतांच्या नावाची राखीव खुर्ची; व्यासपीठानं वेधलं लक्ष
PM CARES Fund : रतन टाटा पीएम केअर्स फंडाचे नवे ट्रस्टी

सामनामधून असेल किंवा थेट संवादातून असेल संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू कायमचं सक्षमपणे मांडली. त्यामुळेच भलेही संजय राऊत शिवसेनेच्या आजच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहू शकणार नसले तरी त्यांचा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावर त्यांच्यासाठी एक खुर्ची राखून ठेवण्यात आली असल्याचं शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.