Shivsena Podcast : पसाभर गद्दारांपेक्षा मूठभर निष्ठावंत पुरेसे; शिंदे गटावर उद्धव ठाकरेंची टीका

उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन : मुलाखतीचा पहिला भाग प्रकाशित
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSakal
Updated on

मुंबई : ‘ईडी,’ ‘सीबीआय,’ आणि इन्कमटॅक्स हे तीनच भाजपप्रणित ‘एनडीए’ला समर्थन देणारे तीन बडे पक्ष असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. जनता मोदी सरकारवर कमालीची नाराज झाली असून, येत्या लोकसभा निवडणुकीत जनमताचा वेगळा कौल समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांना ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग प्रकाशित झाला असून, ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपने केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या यंत्रणांचा वापर करून राजकीय हिशेब चुकते केल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला.

‘‘अती झाले की जनता उत्तर देतेच, वरती जे जाते ते खालती येतेच, असा निसर्गाचा नियम आहे,’’ असे म्हणत त्यांनी निवडणूक निकालात ‘एनडीए’चे काय होते ते बघा, असे सांगितले. महाराष्ट्रात ज्यांनी घडामोडी घडवल्या त्यांचा घडा आता मोडायची वेळ आल्याचेही ते म्हणाले. आम्ही म्हणजे शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला म्हणतात पण राष्ट्रवादी काँग्रेसने काय केले होते? त्यांचा पक्ष का फोडला अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

माझ्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार हे खेकड्यांनी पोखरून काढले होते, असा टोमणा मारत ते म्हणाले, ‘‘सगळे योजनेतून ठरवून झाले असावे. धरणातले खेकडे माती भुसभुशीत करत असतात. त्यामुळे सरकार पडले. आपल्या लोकांवर मी विश्वास ठेवला होता, त्यांनी धरण पोखरले. मी पूर्वीही म्हणालो होतो, ‘‘सडकी पाने गळतात, पडतात.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Nanded : चोरीच्या अडीच लाखाच्या आठ दुचाकी जप्त

तसे झाले आहे. मनात आणले असते तर मी या आमदारांना हॉटेलात ठेऊन दिले असते, पण तसे मी केले नाही. मला ही पद्धत मान्य नाही.’’ जनता माझ्यासमवेत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.धनुष्यबाण किंवा मशाल याने मला फरक पडत नाही. पण शिवसेना हे नाव महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

शिवसेना हे पक्षाचे नाव कुणी कसे हिरावू शकेल? ते दुसऱ्याला मिळेल तरी कसे असा प्रश्न करीत त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात हे माझ्या आजोबांनी, वडिलांनी ठेवलेले नाव आहे. आपल्या पक्षाचे चिन्ह बदलले तरी मशाल तेवतच राहील.

...मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात

पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात, अशा शब्दांत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर टीका केली. ‘‘काही वेळा आपली फसगत होते. ज्यांना आपण आपलं मानतो पण ती बांडगुळं निघतात. तरीदेखील ती आपल्याबरोबर आहेत असं आपल्याला वाटत राहतं,’’ अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Nanded News : वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त, अपुरा औषधीसाठा; मुक्रमाबाद आरोग्य केंद्राची व्यथा

‘ही तर मळमळ’

मुलाखतीच्या पहिल्या भागावर बोलताना भाजपच्या आशिष शेलार यांनी, ‘ही केवळ मळमळ आहे,’ असा आरोप केला. शिंदे गटाने आज सकाळपासून या विषयावर टीकास्त्र सोडले. ‘‘कायम तेच ते बोलतात, विकासाच्या ‘व्हिजन’बद्दल काहीही बोलण्यास उद्धव ठाकरे कधीही पुढे येत नाहीत,’’ असे मंत्री शंभूराज देसाई यांनी नमूद केले.

नाव काढून घेणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तेथे आपल्याला नक्की न्याय मिळेल. सर्वोच्च न्यायालयाने पक्षफूट, आमदारांचे निलंबन याबाबत अत्यंत योग्य निर्देश दिले आहेत. आता त्यात पुढे काय होते ते पाहायचे.

-उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.