प्रताप सरनाईकांच्या पत्रावर संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया

प्रताप सरनाईकांच्या पत्रावर संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया शिवसेनेने पुन्हा भाजपशी युती करावी अशा आशयाचं प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र Shivsena Pratap Sarnaik Letterbomb Sanjay Raut reaction targets National Investigation Agency
sanjay raut
sanjay raut
Updated on

शिवसेनेने पुन्हा भाजपशी युती करावी अशा आशयाचं प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: पालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल, अशी विनंती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केल्याची चर्चा आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत आणि आपला पक्ष कमकुवत होत चालला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींशी जुळवून घेतलेले बरे होईल, असे पत्रात सरनाईक यांनी लिहिलं आहे. तसेच, सध्या शिवसेनेच्या काही लोकांना कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून नाहक त्रास सुरु आहे. मोदींशी जुळवून घेतल्यास आम्हाला व आमच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे, असेही पत्रात नमूद केले आहे. या पत्रावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावध पण रोखठोक प्रतिक्रिया दिली. (Shivsena Pratap Sarnaik Letterbomb Sanjay Raut reaction targets National Investigation Agency)

sanjay raut
भाजपशी जुळवून घ्या, शिवसेना आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी

"प्रताप सरनाईक यांनी जर पत्रातून काही मत मांडलं असेल तर त्यात प्रतिक्रिया देण्यासारखं काहीच नाही. त्यांच्या पत्रात एक महत्त्वाचं वाक्य आहे की शिवसेनेच्या काही नेतेमंडळींना विनाकारण त्रास दिला जातोय. कोण, कोणाला आणि का विनाकारण त्रास देत आहे हा या पत्रामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासंदर्भात आमचा अभ्यास सुरू आहे", अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

MP Sanjay Raut
MP Sanjay Raut

नक्की काय लिहिलंय त्या पत्रात...

'महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा वंदनीय शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झालेले आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे "माजी खासदार" झालेल्या नेत्यांकडून जी बदनामी सुरु आहे, त्यालाही कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल', असं पत्रात लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.