Ashadi Ekadashi : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी विठ्ठलाकडे साकडे, वाचा नक्की कुठे घडला प्रकार?

Uddhav Thackeray: उध्दव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी शहाड बिर्ला मंदिरातील विठ्ठलाकडे साकडे घातले
Ashadi Ekadashi : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी विठ्ठलाकडे साकडे, वाचा नक्की कुठे घडला प्रकार?
uddhav thackery cm sakal
Updated on

Ulhasnagar: आषाढी एकादशी निमित्ताने गेल्या 18 वर्षांपासून पालखी दिंडीची परंपरा कायम ठेवणाऱ्या उल्हासनगरातील शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने उध्दव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी शहाड बिर्ला मंदिरातील विठ्ठलाकडे साकडे घातले.

Ashadi Ekadashi : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी विठ्ठलाकडे साकडे, वाचा नक्की कुठे घडला प्रकार?
Ulhas River : अबब! नदी हरवली कुठे? उल्हासनदीवर शेकडो मिटरपर्यंत जलपर्णीचे आच्छादन!

ज्या भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही अशा भाविकांकरिता गेल्या 18 वर्षांपासून मराठा सेक्शन मध्यवर्ती शिवसेना शाखा आणि संतोषनगर शिवसेना शाखेच्या वतीने पालखी दिंडीचे आयोजन करण्यात येत असते.

यावर्षी टाळ मृदुंग,पारंपरिक वेशभूषा आणि विठ्ठल नामाच्या गजरात माजी नगरसेवक,नगरसेविका,पदाधिकारी व शेकडो भाविकांच्या सहभागाने अनेक किलोमीटर अंतरावर असलेल्या शहाड मधील बिर्ला मंदिरात दिंडी पालखीचे समापन करण्यात आले.यात बच्चेकंपनीचा सहभाग लक्षणीय होता.

याप्रसंगी विठ्ठलाची पूजा करताना जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी उध्दव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी विठ्ठलाकडे साकडे घातले.

Ashadi Ekadashi : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी विठ्ठलाकडे साकडे, वाचा नक्की कुठे घडला प्रकार?
Ulhasngar: स्वर्गरथाची चाके रस्त्यात अडकली, मद्यपी चालकाला कारणे दाखवा नोटीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.