Sanjay Raut: अजित पवार शरद पवारांपेक्षा मोठे कधी झाले?; संजय राऊतांचं वक्तव्य

ncp ajit pawar sanjay raut
ncp ajit pawar sanjay rautsakal
Updated on

Shivsena sanjay raut said about ncp ajit pawar

मुंबई- केंद्रीय स्तरावरची ऑफर द्यायला, अजित पवार शरद पवारांपेक्षा मोठे कधी झाले, असं वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि नेते अजित पवार यांच्यामध्ये शनिवारी भेट झाली होती. तेव्हापासून त्यांच्या भेटीबाबत वेगवेगळे अर्थ लावले जाऊ लागले आहेत. शरद पवार भाजपसोबत आल्यास त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाईल अशी ऑफर अजित पवारांनी दिल्याची चर्चा आहे. याच अनुषंगाने संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

अजित पवार शरद पवारांपेक्षा मोठे कधी झाले. त्यांना केंद्रीय स्तरावरची ऑफर द्यायला लागले.अजित पवार आणि शरद पवार कौटुंबिक नात्याने बांधलेले आहेत. त्यांचे कुटुंब मोठं आहे. त्यांच्या अनेक संस्था एकत्र आहेत. त्या संदर्भात काही अडचणी आहेत. पण, जेवढं मी शरद पवारांना ओळखतो, त्यानुसार ते भाजपसोबत हातमिळवणी करतील असं मला वाटत नाही. मला त्यांच्याबाबत विश्वास आहे, असं राऊत म्हणाले.

ncp ajit pawar sanjay raut
Narayan Rane : शरद पवार कृषीमंत्री होणार का? नारायण राणे म्हणाले...

शरद पवार नव्याने पक्षबांधणीसाठी बाहेर पडले आहेत. एका जिद्दीने ते मैदानात उतरले आहेत.त्यांना जे सोडून गेलेत त्यांच्याची पवारांचा काही संबंध नाही. हे त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसत आहे. त्यामुळे एखाद्या भेटीमुळे असा अर्थ काढणे योग्य नाही. माझे कालच त्यांचे दूरध्वनीवरुन बोलणं झालं आहे. इंडिया आघाडीचे ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. त्याबाबत आमच्यात चर्चा झाली आहे, असंही ते म्हणाले.

ncp ajit pawar sanjay raut
Ajit Pawar Latest News : '...तरच अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, भाजपने ठेवली मोठी अट',या बड्या नेत्याचा दावा

पुढील निर्णय लवकरच

पुढच्या चार दिवसात सर्व झाडाझडती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना स्थिरस्थावर होऊ द्या. त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालू त्या. पुढच्या दोन-तीन दिवसात मी त्यांना भेटणार आहे.ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र राहणार आहोत. पुढील स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पंतप्रधान मोदी गुजरातमधून पाहतील. इंडियाचे सरकार लाल किल्ल्यावरुन झेंडा फडकावेल, असं राऊत म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.