"राऊतसाहेब, डोळे उघडा..."; भाजपच्या केशव उपाध्येंची टीका

"राज्याचा आंधळा कारभार पाहण्याएवढा डोळसपणा पत्रकाराने तरी दाखविला पाहिजे"
BJP-Keshav-Upadhye-Shivsena- Sanjay-Raut
BJP-Keshav-Upadhye-Shivsena- Sanjay-Raut
Updated on
Summary

"राज्याचा आंधळा कारभार पाहण्याएवढा डोळसपणा पत्रकाराने तरी दाखविला पाहिजे"

मुंबई: देशात कोरोनाबाबतची (Coronavirus) भीतीदायक परिस्थिती आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) या संदर्भात काहीच बोलत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षांकडून (Opposition) सातत्याने केला जात आहे. भारत देशाचा कारभार हा रामभरोसे चालत आहे, असे मत शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत व्यक्त केले. त्यांच्या या टीकेला भाजप केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी प्रत्युत्तर दिलं. (Shivsena Sanjay Raut slammed by BJP Keshav Upadhye over CM Uddhav Thackeray Work from Home)

BJP-Keshav-Upadhye-Shivsena- Sanjay-Raut
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह गायब? संजय राऊत म्हणतात...

"हा देश रामभरोसे चालत आहे असं संजय राऊत म्हणाले. राऊतजी एवढे अगतिक का? घरबसल्या आभासी कारभार करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला असे आडून टोमणे मारणे त्यांच्यातील राजकारण्याला शोभत असले तरी... त्यांनी आपल्यातील पत्रकाराला जाब विचारला पाहिजे. राज्याचा आंधळा कारभार पाहण्याएवढा डोळसपणा त्यांच्यातील पत्रकाराने तरी दाखविला पाहिजे. राऊतसाहेब, डोळे उघडा... देशात कोरोनाचा हाहाःकार उडाला. त्यात सर्वाधिक महाराष्ट्राचा वाटा आहे हे कसं विसरून चालेल? या कठीण परिस्थितीत जनतेला मदत करण्याऐवजी मंत्री अधिकाऱ्यावरून भांडत आहेत, पीआर कंत्राट दिली जात आहेत… किती यादी सांगू?", असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.

संजय राऊत काय म्हणाले...

"कोणी काहीही म्हणत असेल तरी मी सांगतो की पंतप्रधान गायब नाहीत. ते आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतात. गृहमंत्रीदेखील आहेत, ते देखील चर्चेत उपस्थित असतात. पण ते दोघे दिसून येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या देशात सरकार आहे, प्रशासन आहे, पंतप्रधान आहेत, आरोग्य मंत्रीही आहेत, केंद्र सरकारदेखील जागेवरच आहे पण त्यांचे अस्तित्व जाणवेल अशाप्रकारे कार्यप्रणाली वापरणं गरजेचं आहे. देश रामभरोसे चालतो आहे. कोणाचेही अस्तित्व अदृश्य होऊन चालणार नाही", असं मत राऊत यांनी व्यक्त केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.