राजधर्माचं पालन केलं नाही, तर...- संजय राऊत

पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला दिला सूचक इशारा
Sanjay-Raut-Attitude
Sanjay-Raut-AttitudeE-Sakal
Updated on
Summary

पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला दिला सूचक इशारा

मुंबई: "दिल्ली असो किंवा गल्ली, सामना (Saamana) वाचावाच लागतो. सामना काय करू शकतो, हे महाराष्ट्रातल्या (Maharashtra) सत्तांतरात आपण पाहिलं असेल. काँग्रेसच्या (Congress) पराभवाबाबत जे प्रश्न 'सामना'ने उपस्थित केले ते पोटतिडकीने केले होते. तेच प्रश्न सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीही उपस्थित केले. महाराष्ट्रात कोण काय बोललं, त्यापेक्षा राष्ट्रीय प्रश्नांवर (National Issues) राष्ट्रीय नेते काय बोलले, याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे. राजधर्माचे पालन केले नाही तर देशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल", असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या सरकारला दिला. (Shivsena Sanjay Raut Slams PM Modi led Govt of India over National Issues)

Sanjay-Raut-Attitude
माझा पंतप्रधान मोदींवर पूर्ण विश्वास आहे - संजय राऊत

"लोकांचे कोरोनामुळे जीव जात आहेत, ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रामध्ये काही दिवस ऑक्सिजनची कमतरता होती. परंतु सरकारने व्यवस्थापन करून तो प्रश्न सोडवला. इतर ठिकाणची सरकारी यंत्रणा कशा पद्धतीच्या उपाययोजना करते, हे सध्या नॅशनल टास्क फोर्सला माहिती नाही. त्यामुळे त्यांना थोडी जास्त मेहनत करावी लागेल", असे राऊत म्हणाले.

"बिहारमधले मृतदेह वाहून पाटणापर्यंत पोहोचले हे चित्र खूपच भयावह आहे. देश ज्या परिस्थितीमधून जातो आहे, त्याचं भयंकर चित्र समोर आलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारांना विनंती आहे की त्यांनी काही वैद्यकीय सेवांची कमतरता असल्यास ती लपवू नये. सर्व राज्य एकत्र मिळून काम करूया. कारण देश हा एकच आहे. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांसोबत संवाद साधला पाहिजे. ते जास्त महत्त्वाचं आहे", असे प्रामाणिक मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.